विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीत अस्वस्थतेचा ज्वालामुखी खदखदत आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे 25 – 25 आमदार नाराज आहेत, पण आता ही नाराजी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येही उघडपणे दिसून येत आहे.Congress Unrest: Home Minister Dilip Walse is angry with Patil !!; Government crimes against you and Congress ministers
सरकार आपले आहे आणि आपल्याच मंत्र्यांवर पोलिस गुन्हे दाखल करत आहेत, अशी नाराजी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे दोन मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या एका कार्यक्रमात तलवारी नाचवल्या. त्याबद्दल या दोन्ही मंत्र्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
या संदर्भातली मूळ तक्रार भाजपचे मुंबईतले नेते मोहित कंबोज यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर गुन्हे दाखल केले. याबद्दलची नाराजी असलम शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केली.
आधीच उद्धव ठाकरे नाराज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हजेरीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर मंत्र्यांचा नाराजीचा गुस्सा फुटला. आधीच दिलीप वळसे-पाटील यांच्या सौम्य भूमिकेवर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधात केंद्रीय तपास संस्था हात धुऊन मागे लागलेल्या असताना भाजप नेत्यांवर वळसे पाटील यांचे गृहमंत्रालय नीट कारवाया करत नाही असा मुख्यमंत्र्यांचा आक्षेप असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस मंत्र्यांची नाराजी
या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे मंत्री देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतच दिसून आल्याचे समजते. त्यातच राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही भर पडल्याचे दिसते. आपलेच सरकार असताना आपल्याच मंत्र्यांवर पोलिस गुन्हे दाखल करतात हा काय प्रकार आहे?, असा सवाल त्यांनी केल्याचे समजते.
मंत्र्यांच्या या नाराजीवर संबंधित तलवार नाचविण्याच्या कार्यक्रमातला नेमका अहवाल पोलिसांकडून मागवण्यात घेऊन पुढची कारवाई करण्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे. पण या निमित्ताने एक बाब स्पष्ट झाली, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या आमदारांची नाराजी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंत्र्यांमध्येही उमटल्याचे आढळून आले.
Congress Unrest: Home Minister Dilip Walse is angry with Patil !!; Government crimes against you and Congress ministers
महत्त्वाच्या बातम्या
- रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव आज भारत दौऱ्यावर ; तेल खरेदी आणि रुपया-रुबल व्यापारावर होऊ शकते चर्चा
- रडारवरून गायब होणारी हेलिकॉप्टर सैन्यात; १५ हजार फूटावरुन अचूक लक्ष्यभेद क्षमता
- झाडावर कुजलेल्या अवस्थेत मिळाला तरुणीचा मृतदेह
- AAP Maharashtra : आम आदमी पार्टी महाराष्ट्रात भाजप विरुद्ध आक्रमक; पण मते मात्र “खाणार” महाविकास आघाडीची!!