प्रतिनिधी
मुंबई : भाजप – शिवसेनेचे पाठोपाठ काँग्रेसने देखील विधान परिषद निवडणुकीसाठी आपले दोन उमेदवार जाहीर केले असून यातून काँग्रेस पक्षाने मुंबईचा टीमला बळ दिल्याचे स्पष्ट होत आहे. माजी महापौर चंद्रकांत हांडोरे आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. याचे दूरगामी परिणाम मुंबईतल्या राजकारणावर होणार आहेत. Congress strength to Mumbai team; Chandrakant Handore, Bhai Jagtapan’s candidature
मुंबईमध्ये काँग्रेसचे मोठे बळ आहे. महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने 1992 मध्ये शिवसेनेवर मात करून सत्ता मिळवली होती. त्यानंतर चंद्रकांत हंडोरे यांना मुंबईचे महापौर केले होते. नंतर मंत्रीही केले होते. पढ मधल्या काळात चंद्रकांत हांडोरे यांचे नाव मागे पडले होते. परंतु गेल्याच वर्षी त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांचे नाव राजकीय दृष्ट्या पुन्हा चर्चेत आले होते. आता मुंबईच्या टीमला बळ देण्यासाठी चंद्रकांत हांडोरे यांचे नाव तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांचे नाव काँग्रेस पक्षाने विधान परिषद उमेदवारीच्या निमित्ताने पुढे आणले आहे.
आगामी मुंबई महापालिका काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून नव्हे, तर स्वतंत्रपणे लढवणार आहे. यासाठी भाई जगताप आग्रही आहेत. त्यांच्या आग्रहाला देखील विधान परिषद उमेदवारीतून बळकटी आली आहे.
– काँग्रेसची ताकद कमी नाही
राष्ट्रवादी आणि शिवसेना युती विरुध्द भाजप अशा लढतीत मनसेचा देखील छोटा घटक आहे. परंतु काँग्रेस पक्ष मुंबईत स्वबळावर लढून तो शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांचे राजकीय गणित बिघडू शकतो. तेवढी काँग्रेस पक्षाची नक्कीच क्षमता आहे. काँग्रेस हायकमांडने पण भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून त्यांच्या क्षमतेविषयी विश्वास दाखवून त्यांना बळ दिले आहे.
Congress strength to Mumbai team; Chandrakant Handore, Bhai Jagtapan’s candidature
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ठाकरे – पवारांचे निमंत्रण नाही!!
- राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचा एकजुटीचा नेट, पण दोन मतांमध्ये घट!!
- जाहिरातीवरून वाद : बॉडी स्प्रे ब्रँडने केली होती बलात्काराला चालना देणारी जाहिरात, वाद सुरू झाल्यावर मागितली माफी
- राज्यसभा निवडणुकीची धास्ती आणि विधान परिषदेसाठी इच्छुकांची सर्वपक्षीय गर्दी!!