विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कायदेशीर पेच प्रसंग टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने अखेर रद्द केली. पण या सगळ्या प्रकारात महाविकास आघाडीमधला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यातला एक वेगळ्या प्रकारचा बेबनाव समोर आला आहे. Congress presides over assembly; Aggressive letter from CM; NCP’s “cautious” side !!
विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. त्यासाठी आक्रमक होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध भूमिका घेत राज्यपालांच्या संमतीशिवाय अध्यक्षपदाची निवडणूक नको असे सांगून महाविकास आघाडीच्या आक्रमकतेला वेसण घातली आहे. वास्तविक पाहता राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिण्यापूर्वी या सर्व बाबी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देता आल्या असत्या. परंतु पत्र लिहिण्यापूर्वी याबाबत मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही चर्चा केली आहे किंवा नाही याचे तपशील अद्याप बाहेर आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आक्रमकपणे पत्र लिहित राज्यपालांना विधिमंडळाने केलेले कायदे तपासण्याचा अधिकार नाही, असे म्हटले होते. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनी अभ्यास करू नये वगैरे शेरेबाजी केली. आज सकाळी उदय शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला घाबरलोय, असे समजू नये असे वक्तव्य केले. एकूण महाविकास आघाडीत शिवसेना पक्ष म्हणून अधिक आक्रमक दिसली.
त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांच्या संमतीशिवाय विधानसभेचे अध्यक्ष यांची निवडणूक घेऊ नये, असे अशी भूमिका मांडली आणि एक वेगळा पेच महाविकास आघाडीत तयार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पेचावर मात करण्यासाठी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. पण तिथेही मुख्यमंत्र्यांना अपेक्षित उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखेरीस राजकीय चित्र असे तयार झाले, की विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री त्यासाठी आक्रमक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला सावध भूमिका घेत अडथळा आणला आहे…!!
– मग हा अडथळा कशातून आला आहे?
कदाचित तो राष्ट्रवादीला पसंत नसलेल्या अध्यक्षपदाच्या नावांमध्ये असावा. काँग्रेसने राजकीय चतुराईने जी नावे अध्यक्षपदासाठी पुढे केली ही दोन्ही नावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नापसंत आहेत. ते म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि वरिष्ठ आमदार संग्राम थोपटे यांची.
पृथ्वीराज चव्हाण यांचा शरद पवारांची थेट राजकीय पंगा आहे. संग्राम थोपटे यांचा थेट शरद पवारांची राजकीय पंगा नाही, पण त्यांचे पिताश्री अनंतराव थोपटे यांच्याशी मात्र शरद पवारांचा जुना राजकीय पंगा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने घटनात्मक पेच प्रसंगाच्या निमित्ताने टाळण्याच्या निमित्ताने काँग्रेसच्या या दोन वरिष्ठ नेत्यांचा पत्ता आणखी काही काळ कट करून ठेवला आहे.