विशेष प्रतिनिधी
उस्मानाबाद : सहकारी बॅँकांच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवितात हे उस्मानाबाद जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतही दिसून आले आहे. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढविली, बहुमत मिळविले. मात्र, पदाधिकारी निवडीच्या वेळी शिवसेनेला अलगद बाजुला ठेवला.Congress-NCP’s lesson to Shiv Sena, despite holding joint elections, kept the away from office bearers election
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. यातील पाच जागा बिनविरोध निघाल्या होत्या, तर १० जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. यामध्ये सर्वच दहाही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.
सोमवारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होती. कॉँँग्रेसचे बापूराव पाटील यांनी अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यापाठोपाठ शिवसेनेचेही अर्ज दाखल झाले. शिवसेनेकडून अध्यक्ष पदासाठी संजय देशमुख, तर उपाध्यक्ष पदासाठी बळवंत तांबारे यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक बिनविरोध व्हावी,
यासाठी माघार घेण्याच्या वेळेपर्यंत प्रयत्न झाले. मात्र, कोणीही माघार न घेतल्याने शेवटी मतदान घ्यावे लागले. यामध्ये ११ मते घेऊन बापूराव पाटील व मधुकर मोटे विजयी झाले, तर शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख व बळवंत तांबारे यांना प्रत्येकी ४ मते पडली.
महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अगदी निवडीच्या काही काळ आधीपर्यंत सर्व काही आलबेल होते. मात्र, काही तास आधी शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला आणि सेनेचे अर्ज भरले गेले.
Congress-NCP’s lesson to Shiv Sena, despite holding joint elections, kept the away from office bearers election
महत्त्वाच्या बातम्या
- Exit Poll : उत्तर प्रदेशासह 5 राज्यात चर्चा महिलांच्या status voting ची आणि तरुणांच्या class voting ची…!!
- नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक
- Uttar Pradesh Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये जय भाजपा तय भाजपा ! डबल इंजिन सरकार … मोदी-योगी सरकार..
- विधानसभा अध्यक्ष निवडणूक : 9 तारखेची परवानगी मागण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला… पण निवडणूक होणार??