पदोन्नतीतील आरक्षणावरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. अजित पवार यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची भूमिका असली तरी नितीन राऊत यांनी याबाबतचा शासन आदेश मानण्यास नकार दिला आहे.Congress-NCP clash again over reservation in promotion,Nitin Raut’ said not obeying government orders
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पदोन्नतीतील आरक्षणावरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. अजित पवार यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची भूमिका असली तरी नितीन राऊत यांनी याबाबतचा शासन आदेश मानण्यास नकार दिला आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणाºयाा जीआरवर (शासकीय आदेश) निर्णय होईपर्यंत कोणतीही पदोन्नती करायची नाही, असे मंत्रिमंडळ समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ठरले असल्याचा दावा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.
ते म्हणाले की, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची उपसमिती आहे. या उपसमितीला डावलून ७ मे रोजीचा जीआर काढण्यात आला. हा अन्याय आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश होता म्हणून जीआर काढला असे प्रशासन सांगते पण पदोन्नतीत आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दोन आदेश आहेत त्याचा आधार प्रशासनाने का घेतला नाही?
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात पदोन्नतीत आरक्षणाचा विषय आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आम्ही मागासवगीर्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळवून देणारच .
राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. पण या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. राज्यसेवेत असलेल्या कर्मचाऱ्यां ची पदोन्नती सेवाज्येष्ठतेनुसार करून कोट्यातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयावरून अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात वाद सुरू आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देऊन रिक्त जागा भरण्याची पवारांची भूमिका आहे.
Congress-NCP clash again over reservation in promotion,Nitin Raut’ said not obeying government orders
महत्त्वाच्या बातम्या
- TheFocusIndia चे देदीप्यमान यश! अल्पावधीतच १ कोटी पेज व्ह्यूजची भरारी ; वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश; आभार
- कॉँग्रेसची आता ट्विटरकडे मदतीची याचना, जे. पी. नड्डा, स्मृति इराणी, बी.एल. संतोष यांची अकाऊंट बंद करण्याची मागणी
- निष्काळजीपणाचा कळस, देशातील ५० टक्के लोक अद्यापही मास्क वापरतच नाही, मास्क वापरणाऱ्यांपैकीही १४ टक्केंचाच योग्य पध्दतीने वापर
- पुण्याच्या सोळा वर्षीय मुलाने टिपले चंद्राचे सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र