Congress MP Rajiv Satav died : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. Congress MP Rajiv Satav died due to corona infection in Pune Jahangir Hospital
विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. कोरोनातून बरे झाल्यानंतर राजीव सातव यांना पुन्हा त्रास होऊ लागला होता. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. हा व्हायरसही नवीन प्रकारचा असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. सातव हे कोरोनातून बरे झाल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. राजीव सातव यांच्या शरीरात इन्फेक्शन वाढल्याने ते व्हेंटिलेटरवर होते. तज्ज्ञ डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले. रविवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाची माहिती देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “निशब्द आहे. आज एक असा साथी गमावला ज्याने सार्वजनिक आयुष्यातील पहिले पाऊल युवक काँग्रेसमध्ये माझ्यासोबत ठेवले आणि आजपर्यंत सोबत चाललो. राजीव सातव यांचा साधेपणा, स्मित, जमिनीशी जोडलेली नाळ, नेतृत्व आणि पक्षनिष्ठा कायम स्मरणात राहील. अलविदा मेरे दोस्त!”
राजीव सातव 23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगण्यात येते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. 19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
Congress MP Rajiv Satav died due to corona infection in Pune Jahangir Hospital
महत्त्वाच्या बातम्या
- Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर एनडीआरएफ सतर्क, अनेक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता
- वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी
- Mars Mission : सहा चाकांचे ‘जू रोंग’ रोव्हर लालग्रहावर उतरवण्यात चीनला यश, भारताचीही पुढच्या वर्षी मंगळयान-2ची तयारी
- जगण्यासाठी आम्हाला धर्म बदलण्याची वेळ, दुचाकीवरून आलेल्या राज्यपालांसमोरच लोकांनी रडत सांगितली आपबिती
- जगनमोहन रेड्डींविरोधात बोलणाऱ्या खासदाराला पोलीसांची थर्ड डिग्री, चालता येईना इतकी कोेठडीत मारहाण