• Download App
    कॉँग्रेसचे खासदार कुमार केतकर म्हणतात, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते|Congress MP Kumar Ketkar says the state's Maha Vikas Aghadi government could collapse at any time

    कॉँग्रेसचे खासदार कुमार केतकर म्हणतात, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कधीही कोसळू शकतं, अशी भीती काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी वर्तवली आहे. त्यांनी कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील आॅपरेशन लोटस मोहिमेची आठवण करुन देत सरकार कधीही कोसळू शकेल, असे म्हटले आहे.Congress MP Kumar Ketkar says the state’s Maha Vikas Aghadi government could collapse at any time

    केतकर म्हणाले, ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं. भाजप हा अत्यंत साधनशूचिता असणारा पक्ष आहे. कर्नाटकमध्ये काय झालं, मध्यप्रदेशात काय झालं हे पाहिलं की लक्षात येतं.



    ज्यावेळी तथाकथित लोटस कँपेनमध्ये लोक स्वत:च राजीनामा देतात आणि निवडणुकीत बहुमत मिळालेल्या सरकारला जुमानत नाहीत आणि पुन्हा निवडून येतात. हे सर्व कसं रीतसर, घटनात्मक पद्धतीने होते.
    राज्यातील महाविकास आघाडी सरकार सध्य अडचणीत आहे.

    दोन मंत्री कारागृहात असून अनेकांची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ११ मार्चनंतर सरकार पडू शकते, असे म्हटले आहे.

    Congress MP Kumar Ketkar says the state’s Maha Vikas Aghadi government could collapse at any time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!