प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसश्रेष्ठींनी पुणे जिल्ह्यातल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित केले असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील चर्चेनंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक याच पावसाळी अधिवेशनात घेण्याचा निर्णय झाला असल्याचे बोलले गेल्यानंतर संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा पुढे आली. congress MLA sangram thopate`s name is on the forefront for maharashtra assembly speaker post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले. ते शरद पवारांना आवडले नव्हते. पण त्यांना तो निर्णय स्वीकारावा लागला होता. आता दुसऱ्या नेत्याला त्यातही पुणे जिल्ह्यातील संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्याचे काँग्रेसमध्ये घाटत आहे. पवारांच्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात थोपटे “बसत” नाहीत. कारण ते पवारांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत. पण कदाचित त्यामुळेच संग्राम थोपटे यांचे नाव काँग्रेसने निश्चित करून ते पवारांना स्वीकारणे भाग पाडत असावे.
संग्राम थोपटे यांनी काल महसूलमंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. त्यांच्यात एक बैठकही झाली होती. त्या बैठकीस उपस्थित असलेल्या दुसऱ्या आमदाराने संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे निश्चित झाल्यानंतर विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार व नितीन राऊत यांची नावे पुढे आली होती. विधानसभा अध्यक्षपदी यापैकी एकाची नियुक्ती करून त्यांचे मंत्रिपद पटोले यांना दिले जाईल, अशी चर्चा होती. पण, त्यामुळे पक्षात बरेच फेरबदल करावे लागले असते म्हणून काँग्रेसश्रेष्ठींनी हे फेरबदल करण्याचे टाळल्याचे सांगितले जात आहे. त्याऐवजी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची या पदासाठी निवड केल्याचे समजते.
congress MLA sangram thopate`s name is on the forefront for maharashtra assembly speaker post
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Update : कोरोना संसर्गाचा वेग झाला कमी, सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 24 तासांत 817 मृत्यू
- Raj Kaushal Death : प्रसिद्ध अभिनेती मंदिरा बेदींचे पती राज कौशल यांचे हार्ट अटॅकने निधन
- जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत पॉलिटिकल ड्रामा, बनावट उमेदवाराचा फिल्मी स्टाइल भंडाफोड
- कोरोना काळात भारताच्या मदतीसाठी अमेरिकेचा पुढाकार, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजनी संमत केला ठराव
- तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तारखा सांगणे चुकीचे – पॉल यांचे मत