प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर मधल्या सिंधी, गुजराती समाजांनी माझ्यावर खूप प्रेम केले. सर्व समाजाने मला नेहमीच पाठिंबा दिला. पण विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये मला कारस्थान करून मुख्यमंत्री पदावरून दूर केले आणि आंध्र प्रदेशात राज्यपाल म्हणून पाठवले. हे मी विसरू शकत नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मनातली खदखद बोलून दाखवली आहे. Congress leaders conspired to dislodge me from chief ministership, alleged sushil Kumar shinde
सिंधी समाजाच्या एका कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी गुजराती समाजाला आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दोन टक्के आरक्षण दिल्याची देखील आठवण करून दिली. आपला जावई गुजराती असल्यामुळे आपण हे केले. जावयाला संभाळावे लागते, असे त्यांनी हसत हसत सांगितले.
पण त्यावेळची सामाजिक परिस्थिती तशी होती. त्यामुळे मी मुख्यमंत्री राहून गुजराती समाजासाठी आरक्षण देऊ शकलो. गुजराती समाजाने मला मदत केली. मी निवडून येऊ शकलो पण नंतर मात्र काँग्रेस पक्षात कारस्थान झाले आणि मला मुख्यमंत्री पदावरून दूर व्हावे लागले. राज्यपाल पदावर मला पाठवून दिले. त्यानंतर मी केंद्रात मंत्री झालो पण नंतर मात्र मला पराभव पत्करावा लागला आणि तो अजून कायम आहे. त्याचे शल्य आहे, अशा शब्दांमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे.
बऱ्याच दिवसांनी सुशील कुमार शिंदे यांचे जाहीर भाषण झाल्याने आणि त्यात त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या काही आठवणी शेअर केल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली असताना आणि त्यामध्ये डार्क हॉर्स म्हणून सुशील कुमार शिंदे यांचे नाव असताना त्यांनीच काँग्रेस मधल्या कारस्थानाचा उल्लेख जाहीर भाषणात करणे यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू आहे.
Congress leaders conspired to dislodge me from chief ministership, alleged sushil Kumar shinde
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हरियाणा काँग्रेसमध्ये घमासान : हुड्डा आणि सुरजेवाला गट आमनेसामने
- मनी लाँडरिंग प्रकरण: जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांकडून समन्स, आज पुन्हा होणार चौकशी
- पाकिस्तान अन्न संकट : सव्वाशे रुपये किलो झाले पीठ, सर्वसामान्यांचे हाल, महागाईने मोडले कंबरडे
- Queen Elizabeth II Funeral: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार, ही विशेष तयारी