• Download App
    आघाडीत बिघाडी : आता काँग्रेस नेत्यानेच राज्यपाल कोश्यारींना लिहिले पत्र, साकीनाका प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंवर 'व्होट बँके'चे राजकारण करत असल्याचा आरोप । Congress Leader vishwabandhu Rai Write To Governor Koshyari Accusing CM Uddhav Thackeray For Vote Bank politics in Sakinaka Rape Case

    आघाडीत बिघाडी : आता काँग्रेस नेत्यानेच राज्यपाल कोश्यारींना लिहिले पत्र, साकीनाका प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंवर ‘व्होट बँके’चे राजकारण केल्याचा आरोप

    vishwabandhu Rai Write To Governor Koshyari Accusing CM Uddhav Thackeray : राज्यातील महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या काही दिवसांच्या अंतरानंतर समोर येत राहतात. तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आता ताजे प्रकरण काँग्रेस नेते विश्वबंधू राय यांच्या पत्राशी संबंधित आहे. राज्यपाल कोश्यारींना पाठवलेल्या या पत्राद्वारे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘व्होट बँक’ राजकारण केल्याचा आरोप केला आहे. Congress Leader vishwabandhu Rai Write To Governor Koshyari Accusing CM Uddhav Thackeray For Vote Bank politics in Sakinaka Rape Case


    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या काही दिवसांच्या अंतरानंतर समोर येत राहतात. तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आता ताजे प्रकरण काँग्रेस नेते विश्वबंधू राय यांच्या पत्राशी संबंधित आहे. राज्यपाल कोश्यारींना पाठवलेल्या या पत्राद्वारे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘व्होट बँक’ राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

    मुंबई काँग्रेसचे माजी सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हे पत्र लिहिले आहे. यासोबतच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे. त्यात त्यांनी लिहिले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे प्रादेशिक पक्षाचे अध्यक्षही आहेत. त्यांची राजकीय चिंता प्रांतवाद आहे. म्हणूनच साकीनाका बलात्कार प्रकरणात थेट परप्रांतीयांना लक्ष्य करून त्यांनी स्वतःच्या व्होट बँकेचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.”

    विश्वबंधू राय यांनी हे पत्र महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार आणि इतर राज्यांच्या लोकांच्या अपमानाविरोधात लिहिले आहे. त्यांनी लिहिले, “साकीनाका बलात्काराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे यासाठी परप्रांतीयांना दोष दिला आहे. कोणत्याही धर्म, भाषा, जातीच्या बलात्काऱ्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.”

    राज्यात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला. त्यांनी लिहिले, “गेल्या काही महिन्यांत मुंबईत महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 144 टक्के वाढ झाली आहे. सन 2020 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बलात्काराचे 2061 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय दररोज अनेक प्रकरणे घडत आहेत.

    विश्वबंधू राय यांनी लिहिले आहे की, कोणत्याही मुख्यमंत्र्याकडून इतर कोणत्याही राज्यातील लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्य करणे हे निंदनीय आहे. त्यांनी प्रश्न केला की, जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री कोणत्याही गुन्ह्यावर राजकारण करू लागतात, तेव्हा राज्यातील जनतेने न्यायासाठी कुणाकडे पाहावे?”

    दरम्यान, परप्रांतीय गुन्हेगारांचा मुद्दा राज्यात काही नवीन नाही. हे वास्तव आहे, जे यापूर्वीही अनेकदा उघडकीस आले आहे. गुजरातेत काही वर्षांपूर्वी झालेल्या एका बलात्काराच्या घटनेवेळीही अख्ख्या गुजरातमध्ये परप्रांतीयांविरोधात रोष होता. तेव्हा रेल्वेने भरभरून परप्रांतीयांची रवानगी राज्याबाहेर करण्यात आली होती. हे अवघ्या देशाने पाहिले आहे. काँग्रेस नेत्याने या पत्रात एक मुद्दा जाणूनबुजून दुर्लक्षित केलाय. तो म्हणजे परप्रांतीयांची फौज राज्यात आणून त्यांना विशिष्ट भागात स्थायिक करून राज्यात कित्येक वर्षांपासून परप्रातीयांच्या व्होट बँकेचे राजकारण सुरू आहे. आता शिवसेनेतर्फे या पत्रावर काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    Congress Leader vishwabandhu Rai Write To Governor Koshyari Accusing CM Uddhav Thackeray For Vote Bank politics in Sakinaka Rape Case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक