• Download App
    फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट । Congress Leader Nitin Raut Demands Padma Award For Late Fr Stan Swamy

    फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट

    Padma Award For Late Fr Stan Swamy : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर विविध संघटनांकडून राज्य सरकारचा व तपास यंत्रणांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नुकतेच मुंबईचे माजी सुपर कॉप ज्युलियो रिबेरो यांनी त्यांना नोबेल शांतता पुऱस्कार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी दिवंगत फादर स्टेन स्वामी यांना पद्म पुरस्कार मिळावा असे ट्वीट केले आहे. Congress Leader Nitin Raut Demands Padma Award For Late Fr Stan Swamy


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर विविध संघटनांकडून राज्य सरकारचा व तपास यंत्रणांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नुकतेच मुंबईचे माजी सुपर कॉप ज्युलियो रिबेरो यांनी त्यांना नोबेल शांतता पुऱस्कार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी दिवंगत फादर स्टेन स्वामी यांना पद्म पुरस्कार मिळावा असे ट्वीट केले आहे.

    5 जुलै रोजी रुग्णालयात स्वामींचे निधन

    मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 84 वर्षीय स्टेन स्वामी यांना 30 मे रोजी मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रदीर्घ उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही, त्यानंतर सोमवारी, 5 जुलै 2021 रोजी त्यांचे निधन झाले.

    बर्‍याच दिवसांपासून आजारी असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांना रविवारीच व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. शनिवारीच स्टेन स्वामी यांची तब्येत खालावत चालल्याची माहिती वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली होती.

    भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गतवर्षी अटक

    फादर स्टॅन स्वामी यांना ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती, तेव्हापासून त्यांना तळोजा जेल रुग्णालयात ठेवण्यात आले होते. 31 डिसेंबर, 2017 रोजी पुण्यातील एल्गार परिषद कार्यक्रमात केलेल्या भाषणांच्या आधारे स्टेन स्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    या कार्यक्रमाच्या दुसर्‍याच दिवसानंतर भीमा-कोरेगाव येथे भीषण हिंसाचार झाला, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आणि मोठा गदारोळ उडाला होता. या संपूर्ण कटात माओवाद्यांचाच सहभाग असल्याचे पुणे पोलिसांनी या प्रकरणात उघड केले होते. यासंदर्भात स्टॅन स्वामी यांना ताब्यात घेण्यात आले होते.

    Congress Leader Nitin Raut Demands Padma Award For Late Fr Stan Swamy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू