• Download App
    जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने हात झटकले खरे, पण दोघांचेही मुद्दे सारखेच कसे?? Congress kept itself away from George Soros's anti modi campaign, but they have the same allegations against modi, how Congress can defend that??

    जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने हात झटकले खरे, पण दोघांचेही मुद्दे सारखेच कसे??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मूळचे हंगेरियन पण त्याच देशात येण्यास बंदी असलेले अमेरिकेतील बिलिनेयर उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी अँटी मोदी कॅम्पेन सुरू केल्यानंतर काँग्रेसने त्या कॅम्पेन पासून हात झटकले आहेत हे खरे, पण तरीही जॉर्ज सोरोस यांचे भाषण आणि काँग्रेसने आतापर्यंत उपस्थित केलेले मुद्दे या यामध्ये विलक्षण साम्य कसे??, हा प्रश्न निर्माण होतो आहे. Congress kept itself away from George Soros’s anti modi campaign, but they have the same allegations against modi, how Congress can defend that??

    जॉर्ज सोरोस यांनी जर्मनीतील म्युनिक मध्ये केलेल्या लिखित भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही मुद्दे मांडले. त्यामध्ये मोदींचे राजकारण मुस्लिम विरोधी हिंसाचारातून सुरू झाल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर मोदी- अदानी संबंध घनिष्ठ आहेत या संबंधातून आदमी अब्जावधीची संपत्ती कमावली. पण त्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. या विषयावर मोदींनी मौन धारण केले आहे. मोदींनी त्यांच्या पार्लमेंटला उत्तर दिले पाहिजे, असा मुद्दा सोरोस यांनी उपस्थित केला आहे. भारत हा लोकशाहीवादी देश आहे, पण मोदी लोकशाहीवादी नाहीत. भारतात लोकशाही पुर्नस्थापित व्हावी. लोकशाही संस्थांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी आपण मदत करू, असेही सोरोस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे.

    याचा अर्थ सोरोस यांनी मांडलेले मुद्दे मोदी लोकशाहीवादी नाहीत. मोदी मुस्लिम विरोधी आहेत. मोदी – अदानी संबंधातून भारतात आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. या सगळ्यांना मोदी जबाबदार आहेत, हे आहेत!!

    मग या आधी खासदार राहुल गांधींनी आणि संपूर्ण काँग्रेस पक्षाने मोदींविरोधात यापेक्षा कोणते वेगळे मुद्दे मांडले होते?? सोरोस यांनी मोदींना मुस्लिम विरोधी हिंसाचाराचे राजकारण करणारे व्यक्ती असे म्हटले आहे, तर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुजरात मधल्या 2007 च्या निवडणुकीत मोदींना “मौत के सौदागर” म्हटले होते. देशात लोकशाही नाही. मोदी – शाहांची हुकूमशाही आहे, असा आरोप राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान तर अनेकदा केलाच आहे. पण भारतातल्या लोकशाही संस्थांवर आरएसएसचा कब्जा आहे, असाही आरोप केला आहे. हा आरोप सोरोस यांनी केलेल्या आरोपापेक्षा वेगळा म्हणता येईल का?? मोदी आणि अदानी संबंधांबाबत सोरोस यांनी केलेले वक्तव्य आणि राहुल गांधींनी अदानी प्रकरणात संसदेत केलेले भाषण यामध्ये भेद आहे का?? त्या आधी देखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी मोदींवर आपल्या उद्योगपती मित्रांना मोदींनी देश विकला आहे, असा आरोप केला आहे. सोरोस यांनी केलेल्या उल्लेखापेक्षा हा आरोप तरी वेगळा आहे का?? हे महत्त्वाचे मुद्दे आणि प्रश्न आहेत!!

    जॉर्ज सोरोस यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्विट करून खुलासा जरूर केला आहे. मोदी विरोधी कॅम्पेन हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष यांच्या धोरणांवर ते अवलंबून आहे. काँग्रेस नेहरूंच्या मार्गाने जाऊन भारतात लोकशाही मूल्य प्रस्थापित करेल, असे जरूर म्हटले आहे. पण यातला नेहरूंच्या मार्गाने जाऊन लोकशाही प्रस्थापित करेल हा मुद्दा वगळला तर जॉर्ज सोरोस यांनी म्युनिक मधल्या भाषणात मोदींविरुद्ध केलेले आरोप आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केलेले आरोप यात खरंच मूलभूत भेद आहेत का?? हा प्रश्नच आहे आणि त्याचे उत्तरही काँग्रेसजनांनी दिले पाहिजे.

    कारण जयराम रमेश यांच्या ट्विट मुळे सोरोस यांच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने हात झटकल्याचे स्पष्ट होते हे खरे!!, पण सोरोस यांचे मोदींवरचे आरोप आणि काँग्रेसने मोदींवर केलेले आरोप यातल्या साम्य स्थळातील मुद्द्यांवर उत्तर मात्र मिळत नाही. ते काँग्रेस नेत्यांनी दिले पाहिजे.

    Congress kept itself away from George Soros’s anti modi campaign, but they have the same allegations against modi, how Congress can defend that??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ammar Yashar : झारखंडमध्ये पकडलेला दहशतवादी अम्मार याशर, ‘इंडियन मुजाहिदीन’नंतर HUT मध्ये होता सक्रिय

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Terrorist Pannu : पहलगाम हल्ल्यानंतर खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पुन्हा गरळ ओकली

    Icon News Hub