• Download App
    महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज!!; बाहेर पडण्याची हिंमत दाखवा; आठवलेंचे आव्हान!! Congress angry over Mahavikas Aghadi !!; Show courage to step out; The challenge of remembering

    महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज!!; बाहेर पडण्याची हिंमत दाखवा; आठवलेंचे आव्हान!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष नाराज आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. Congress angry over Mahavikas Aghadi !!; Show courage to step out; The challenge of remembering

    महाविकास आघाडीतली नाराजी नुसती बोलून दाखवू नका. हिंमत असेल तर बाहेर पडून दाखवा, अशा शब्दात रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या नेत्यांना डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वारंवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर राजकीय कुरघोडी करतात. वेळ प्रसंगी आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे उद्गार आणि नाना पटोले यांनी काढले आहेत.



    – बाळासाहेब थोरात यांची नाराजी

    त्यांच्या पाठोपाठ आज काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याचे बोलून दाखवले आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावर तसेच काँग्रेस आमदारांची कामे होत नाहीत म्हणून ही नाराजी आहे. काँग्रेस हायकमांडशी बोलून आमचे प्रश्न आम्ही सोडवून घेणार आहोत, असे बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

    – काँग्रेस नेते काय उत्तर देणार?

    या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या नेत्यांना महाविकास आघाडीत तुम्ही नाराज आहात हे नुसते बोलून दाखवू नका. तर हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून दाखवा, असे आव्हान दिले आहे. रामदास आठवले यांनी दिलेल्या आव्हानाला काँग्रेसचे नेते आता काय उत्तर देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

    Congress angry over Mahavikas Aghadi !!; Show courage to step out; The challenge of remembering

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा