• Download App
    हिंदूंच्या भावना दुखावल्याने अभिनेत्री आलिया भट विरोधात पोलिसात तक्रार|Complaint lodged against actress Alia Bhatt for hurting the feelings of Hindus

    हिंदूंच्या भावना दुखावल्याने अभिनेत्री आलिया भट विरोधात पोलिसात तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मान्यवर या कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात करताना हिंदूंच्या भावना दुखावल्या असा आरोप करत प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.आलिया भट्ट नुकतीच ‘मान्यवर’या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीत झळकली आहे.Complaint lodged against actress Alia Bhatt for hurting the feelings of Hindus

    आलियाची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. या जाहिरातीत आलिया भट ही कन्यादान प्रथेविषयी बोलताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाल्याचं सांगत एका व्यक्तीने तिच्याविरूद्ध मुंबईतीस सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



    ही जाहिरात हिंदुंच्या भावना दुखावणारी आहे. आधी कन्यादानाचा अर्थ समजून घ्या. हिंदु आणि त्यांच्या परंपरांना विरोध करणं बंद व्हायला हवे, असे म्हटले आहे.मान्यवर मोहे’ हा कपड्यांचा एक ब्रँड आहे. याच्या जाहिरातीत आलिया भट्ट नवरीच्या साजश्रृंगारात मंडपात बसली आहे.

    वडिलांचं घर मुलीचं का नसतं? मुलीला नेहमी परक्याचं धन का म्हटलं जातं? तिचं कन्यादान का केलं जातं? जाहिरातीच्या शेवटी मुलाचे आई-वडीलही आपल्या मुलाचा हात मुलीच्या हातात देण्यासाठी पुढे करतात आणि आलिया म्हणते, ‘नया आयडिया, कन्या मान्यवर. मात्र या जाहिरातीमध्ये हिंदू परंपरेचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे.

    Complaint lodged against actress Alia Bhatt for hurting the feelings of Hindus

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!