• Download App
    राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या विरोधात ईडी व आयटीकडे तक्रार, राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षाकडून भ्रष्टाचाराचे आरोप । Complaint against NCP leader Kalyanrao Kale to ED and IT

    राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या विरोधात ईडी व आयटीकडे तक्रार, राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षाकडून भ्रष्टाचाराचे आरोप

    पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी अलीकडेच विक्री केलेल्या सीताराम महाराज साखर कारखान्या संदर्भात राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व इन्कम टॅक्स (आयटी) विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर काळे हे ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. Complaint against NCP leader Kalyanrao Kale to ED and IT


    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी अलीकडेच विक्री केलेल्या सीताराम महाराज साखर कारखान्या संदर्भात राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व इन्कम टॅक्स (आयटी) विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर काळे हे ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

    पंढरपूर जवळ असलेल्या सिताराम महाराज साखर कारखान्यासाठी काळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कारखान्याचे शेअर्स देतो असे सांगून अनेक शेतकरी, कामगार, शिक्षक आणि वाहन मालक अशा जवळपास 15 हजार लोकांकडून सुमारे 35 कोटी रुपये गोळा करून त्याचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

    मागील काही दिवसांपासून राज्यातील अऩेक साखर कारखान्यावर ईडीची छापेमारी सुरू आहे.अशातच पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे नेते सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल केल्याने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.



    पंढरपूर जवळच्या खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यामध्ये कल्णाराव काळे यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक यांनी हजारो लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. सन 2010 ते 2015 यादरम्यान सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ऊस दिलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक, व्यापारी व शिक्षण संस्थेतील कर्मचार्यांकडून शेअर्स देतो म्हणून सुमारे 35 कोटी रुपये गोळा केले
    आहेत. हे पैसे घेतल्यानंतर अनेकांना पावत्याही दिल्या नाहीत.

    तालुक्यातील अनेक शेतकर्यांकडून शेअर्स पोटी पैसे गोळा केले आहे. परंतु वाडीकुरोली, पिराचीकुरोली आणि धोंडेवाडी या तीन गावातील 4 हजार 952 शेतकर्यांची नावे शेअर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अन्य शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशाचे काय असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे. कारखान्याच्या सर्व आर्थिक व्यवहाराची कसून चौकशी करावी अशी लेखी तक्रार ईडी, आयटी, सेबी आदी संस्थांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. लवकरच याप्रकरणाची चौकशी सुरू केली जाईल असे ईडीच्या अधिकार्यांनी सांगितले आहे. चौकशीनंतर काळे यांचा मोठा आर्थिक घोटाळा समोर येईल असेही पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    Complaint against NCP leader Kalyanrao Kale to ED and IT

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी