• Download App
    राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ पोस्टर्सवर भावी खासदारांची स्पर्धा!! Competition of future MPs on posters after the future Chief Minister in NCP!!

    राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ पोस्टर्सवर भावी खासदारांची स्पर्धा!!

    प्रतिनिधी

    पुणे : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अद्याप एक ते दीड वर्ष लांब असतानाच बाकीच्या राजकीय पक्षांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदापासून ते आमदार – खासदार पदापर्यंत जोरदार स्पर्धा लागली आहे, पण ती पोस्टर्सवर!! Competition of future MPs on posters after the future Chief Minister in NCP!!

    राष्ट्रवादीत स्वतःलाच एकापेक्षा एक वरचढ दिग्गज नेते म्हणून घेत नेत्यांच्या अनुयायांनी आपापल्या नेत्यांना भावी मुख्यमंत्री भावी आमदार भावी खासदार म्हणून पोस्टर्सवर चढवून ठेवले आहे. जयंत पाटील, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे यांची “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टर्स यापूर्वीच लागली आहेत. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्या रूपाने विद्यमान खासदार असताना माजी आमदार विलास लांडे यांची भावी खासदार म्हणून पोस्टर्स लागली आहेत.

    लोकसभा निवडणुकीची तयारी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच सुरू केली आहे. पक्षनेत्यांनी मुंबईत गेल्या दोन दिवसांत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यात मावळचा आढावा आज झाला, तर शिरूरचा नंतर होणार आहे. मात्र, शिरूरच्या आढावा बैठकीपूर्वीच शिरूरमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. तेथील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याने पक्षाने तेथे नव्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. त्यातून पक्षाध्यक्ष शरद पवारांचे निष्ठावंत राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

    पण राज्याच्या राजकारणात अधिक रस असल्याने वळसे-पाटील दिल्लीला जातील, असे वाटत नाही. पण, त्यापूर्वीच भोसरीचे माजी आमदार आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यांनी तेथून उमेदवारी मागितली आहे. त्यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मुंबईत सुरू असलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीदरम्यान अजित पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली.

    २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिरूरमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांना मिळालेली आहेत. लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त (१ जून) लागलेल्या पोस्टर्स मधून त्यांच्या कार्यकर्त्यांनी २०२४ च्या शिरूर लोकसभेची जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून आले आहे. त्यावर संसदेची इमारत दिसत आहे. विशेष म्हणजे, या पोस्टरवरून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे गायब आहेत. त्यात आता ते आगामी लोकसभा लढणार नसल्य़ाचे संकेत मिळत आहेत.

    गेल्या वर्षभरापासून डॉ.कोल्हे यांचे वागणे पक्षाशी चार हात अंतर राखूनच राहिलेले आहे. पक्षाच्या कार्यक्रमांपासून ते दूर राहत आहेत. हे पक्षाच्या पवारनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खटकत आहे.

    त्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी सलोखा निर्माण केल्यामुळे कोल्हेंच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीतील मोठा गट उदासीन आहे. त्यामुळे राष्ट्रवादी निष्ठावंत विलास लांडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. विलास लांडे दोन वेळा भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीला पडले असले तरी त्यांनी राष्ट्रवादी सोडलेली नाही. त्यामुळे ते आपल्या पवार निष्ठेच्या बळावर राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागून ती मिळवू शकतात, असा त्यांच्या समर्थकांचा होरा आहे.

    Competition of future MPs on posters after the future Chief Minister in NCP!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस