Landslide Disaster : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी केली आहे. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली होती. CM Uddhav Thackeray Visits Taliye Village After Landslide Disaster Assures To Help All
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी केली आहे. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली होती.
तळीये गावात पोहोचून मुख्यमंत्री म्हणाले की, ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्या ठिकाणी पोहताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते. केंद्राने देखील सहाय्य केले, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना दिले.
राज्यातील आपत्तीची महत्त्वाची आकडेवारी
- राज्यातील बाधित जिल्हे : एकूण ९
- कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे
- एकूण बाधित गावे : ८९०
- एकूण मृत्यू : ७६
- हरविलेल्या व्यक्ती : ५९
- जखमी व्यक्ती : ३८
- पूर्ण नुकसान झालेली घरे : १६
- अंशतः: नुकसान झालेली घरे : ६
- प्राण्यांचे मृत्यू : ७५
- सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्ती : ९० हजार
- मदत छावण्या : ४
- निवारा केंद्रे : रत्नागिरी ६ ( २ हजार लोक)
- सुविधांचे नुकसान : चिपळूण येथे वशिष्टी नदीवरील पूल खचला
लष्कर, एनडीआरएफ सहाय्य
एनडीआरएफच्या एकूण २५ तुकड्या असून त्या मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ या ठिकाणी कार्यरत आहेत. भुवनेश्वरहून मागविलेल्या ८ तुकड्या या कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ इथे तैनात केल्या जातीत तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील.
तटरक्षक दलाच्या ३, नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या
बोटी : ५९ ( ४८ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफ)
महाड येथील परिस्थिती :
अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला. सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाले. एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटना स्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरु करण्यात आली.
३ ठिकाणी दरडी कोसळल्या
- तळीये मधलीवाडी (ता. महाड)
- साखरसुतारवाडी
- केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर)
२ कोटी रुपये निधी
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले असून पाउस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे. १००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
CM Uddhav Thackeray Visits Taliye Village After Landslide Disaster Assures To Help All
महत्त्वाच्या बातम्या
- अनोखी शस्त्रक्रिया : रुग्णाला भूल न देताच केले ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन, महिला रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान म्हणत राहिली हनुमान चालिसा! Watch Video
- Mirabai Chanu Profile : ऑलिम्पिक सिल्व्हर जिंकणाऱ्या मीराबाईची कहाणी, वेटलिफ्टिंगमध्ये वयाच्या 11व्या वर्षांपासून घेतेय मेहनत
- Tokyo Olympics : मीराबाई चानूने भारतासाठी जिंकले पहिले मेडल, वेटलिफ्टिंग मध्ये सिल्व्हरची कमाई
- शहरी नक्षलवादी आरोपींना जामीन देण्यास ठाकरे – पवार सरकारचा न्यायालयात विरोध
- Pegasus Effect; की अजब तर्कट??; सरकारी कर्मचाऱ्यांवर मोबाईल कमी वापरण्याचे ठाकरे – पवार सरकारचे बंधन