मालाडच्या मालवणी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. CM Uddhav Thackeray announces Rs 5 lakh assistance to kin of deceased in Mumbai Building Collapse in Malad Malvani
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मालाडच्या मालवणी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात ( शताब्दी रुग्णालय) जाऊन जखमींची विचारपूस केली. याप्रसंगी आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा करून या जखमींच्या प्रकृतीचा आढावा घेतला.
जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे
मालाड येथील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांच्या वारशांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले होते.
11 जणांचा मृत्यू
मालाड पश्चिमधील मालवणी भागातील चार मजली इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले 10 वर्षांच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
CM Uddhav Thackeray announces Rs 5 lakh assistance to kin of deceased in Mumbai Building Collapse in Malad Malvani
महत्त्वाच्या बातम्या
- Mumbai Building Collapse : महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या- दोषींवर कडक कारवाई होणार, इमारत मालक -कंत्राटदारावर गुन्हा दाखल
- PNB Scam : मेहुल चोकसीला मोठा झटका, डोमिनिका सरकारने घोषित केले अवैध अप्रवासी
- ‘मुलींना मोबाइल देऊ नका, गुन्हेगारी वाढण्याचे हेच प्रमुख कारण’, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्यांचे विधान
- राष्ट्रवादी वर्धापनदिनी शरद पवार म्हणाले, शिवसेना हा सर्वात विश्वासार्ह पक्ष, सरकार पाच वर्षे टिकेल!
- रामदेव बाबाही घेणार कोरोनाची लस, म्हणाले- माझा लढा डॉक्टरांशी नव्हे, ड्रग माफियांशी, आणीबाणीत अॅलोपॅथी उत्तम