प्रतिनिधी
मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या काळातल्या विधिमंडळाच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करून घेतली. विधानसभेत भाषण करताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते पदावरुन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर विडंबन काव्यात्मक शरसंधान साधले. इंदिराजींच्या हाताची एकेकाळी किती होती वट, टोमणे सेने बरोबर आता झाली पुरती फरपट!!, असा टोमणा त्यांनी लगावला. CM eknath shinde targets Shivsena and Congress in maharashtra legislative assembly
विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसला संधी न देण्यात आल्यामुळे काँग्रेसमधील नाराजी उघड झाली होती. आता त्यावरूनच मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसला काव्यात्मक चिमटे काढले आहेत.
काँग्रेसवर निशाणा
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कायमच डावलण्यात येत होते. त्याबाबत बाळासाहेब थोरात नेहमी माझ्याकडे तक्रार करत होते. आता विरोधी पक्षात असतानाही काँग्रेसची अवस्था वाईट आहे. महाविकास आघाडीची पुरती गेली रया… दादा, अंबादास बसले आणि काँग्रेसवाले हात चोळत बसले. विरोधी पक्षनेते पद देताना काँग्रेसला विचारण्यात देखील आले नाही. त्यावरुन काँग्रेसने जाहीर नाराजी देखील व्यक्त केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काव्यात्मक चिमटे
इंदिरा गांधींच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेबरोबर आता नुसती झाली फरफट!!, अशी काव्यात्मक टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या कवितांमुळे सभागृहात एकच हशा पिकला. तेव्हा आपण थोडे आठवले सुद्धा आहोत, अशी मिश्कील टिप्पणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
CM eknath shinde targets Shivsena and Congress in maharashtra legislative assembly
- महत्वाच्या बातम्या
- एवढे “खोके” जर सगळ्यांकडे आहेत, तर ईडी – सीबीआयच्या नावाने का ओरडताहेत??
- काँग्रेसचे यूट्यूब चॅनल डिलीट : पक्षाने म्हटले- तांत्रिक बिघाड की हॅकिंग याची चौकशी व्हावी
- आदित्य ठाकरे : विधिमंडळाच्या बाहेर “उलटे घोड्यावर”!!; मंडळात असंसदीय शब्दासाठी टार्गेटवर
- नितीन गडकरींच्या वक्तव्यांचा विपर्यास; माध्यमांना कायद्याचा बडगा दाखविण्याचा इशारा!!
- युवराज उलटे घोड्यावर; आदित्य ठाकरे टार्गेटवर!!