प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रात ठाकरे पवार सरकारने अखेरच्या दिवसांमध्ये घाई गर्दीत मंजूर केलेल्या कामाला शिंदे फडणवीस सरकारने कात्री लावली. अनेक कामांना स्थगिती दिली. या मुद्द्यावरून सध्याचे विरोधी पक्ष सरकारला घेरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या विधिमंडळ अधिवेशनात सरकार कसे आक्रमक राहील याचीच चुणूक दाखवली आहे. CM Eknath Shinde targets NCP over fraudulent lavasa project
आमदनी अठन्नी खर्चा रुपया हा प्रकार ठाकरे पवार सरकारमध्ये होता. त्यामुळे काही कामांना स्थगिती दिली. आम्हाला महाराष्ट्राचा लवासा करायचा नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याने सांगताना सरकार आणि कामांना स्थिती दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाला तितक्याच आक्रमणपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना मुद्दामून लवासा प्रकल्पाचा उल्लेख केला. लवासा प्रकल्प पूर्ण झाला नाही. त्यातले गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले हा शरद पवारांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्याचे उदाहरण एकनाथ शिंदे यांनी देऊ शिंदे फडणवीस सरकारची अधिवेशन काळातली आक्रमक चुणूक दाखवली आहे.
ठाकरे पवार सरकारच्या काळात घाईगर्दीत जे प्रकल्प मंजूर केले होते, जी कामे मंजूर केली होती त्यातले 70 – 80 % प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारने मंजूर केल्याचे एकनाथ शिंदे यांनी लक्षात आणून दिले. मात्र लवासाचा उल्लेख करून एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना डिवचले आहे.
CM Eknath Shinde targets NCP over fraudulent lavasa project
महत्वाच्या बातम्या
- मुस्लिम वक्फ बोर्डाचा बेलगाम कायदा बदला; भाजप खासदाराची राज्यसभेत मागणी; यूपीए सरकारने दिले कोणते अधिकार?
- मत्स्यपालन आणि जलचर क्षेत्रात 55 लाख रोजगाराच्या संधी; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
- महामोर्चा आघाडीचा; अजेंडा राष्ट्रवादीचा; जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची जबाबदारी शिवसेनेची; काँग्रेस, समाजवादी पक्ष “मम” म्हणायला!!