प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राजधानी नवी दिल्लीच्या दौऱ्यात जाहीर केले आहे. याशिवाय हे दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले.CM donates Rs 5 lakh from Delhi to families of those killed in contaminated water at Melghat
मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे ५० जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. दुषित पाण्याने बाधा झालेल्या व्यक्तींना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास त्यांना खाजगी, मोठ्या रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
दुषित पाण्याने बाधा झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतत संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. सर्वांना योग्य उपचार मिळावेत, तसेच यापुढे हानी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे. कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
CM donates Rs 5 lakh from Delhi to families of those killed in contaminated water at Melghat
महत्वाच्या बातम्या
- Shrilanka : महागाई, टंचाईने संतापलेली जनता श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात घुसली!! राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षेंचा पोबारा!!
- बकरी ईद साठी गो वंशाची कुर्बानी नको, त्या रोखा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या पोलीस महासंचालकांना सूचना
- शिंदे – फडणवीस : ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपरिषद निवडणूक नको, निवडणूक आयोगाला करणार सूचना!!
- एकनाथ शिंदे “कुणाचे” मुख्यमंत्री??; संजय राऊत – भाजप समर्थकांमध्ये जुंपली जुगलबंदी!!
- भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांचा चमत्कार; दीव नगरपालिकेच्या सर्व जागांवर भाजपचा भगवा!!