• Download App
    किरीट सोमय्यांना झालेल्या मारहाणीची केंद्राकडून दखल, सीआयएसएफचे अधिकारी चौकशीसाठी पुण्यात|CITF officials in Pune for interrogation of Kirit Somaiya case

    किरीट सोमय्यांना झालेल्या मारहाणीची केंद्राकडून दखल, सीआयएसएफचे अधिकारी चौकशीसाठी पुण्यात

    प्रतिनिधी

    पुणे : महानगरपालिकेत किरीट सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. भाजपने गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपालांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयएसएफचे अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. हे अधिकारी केंद्राला अहवाल दाखल करतील.CITF officials in Pune for interrogation of Kirit Somaiya case

    सध्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, आणखी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा, यास्तव प्रयत्न करण्यात येणार आहे. सीआयएसएफचे जवान किरीट सोमय्यांसोबत होते.



    त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी तक्रार केलीय की, आमच्या जवानानांही धक्काबुक्की झाली आहे. त्यामुळे केंद्राने थेट यामध्ये दखल घेतली आहे.पुणे महापालिकेच्या पायºयांवर शनिवारी किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती.

    सोमय्या हे महापालिकेत संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाच्या बनावट कंपनीविरोधात तक्रार देण्यासाठी आले होते. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह दहा ते अकरा कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना धक्काबुक्की केली होती. यावेळी सोमय्या पायºयांवर पडल्याने त्यांना दुखापतही झाली होती.

    CITF officials in Pune for interrogation of Kirit Somaiya case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस