विशेष प्रतिनिधी
बीड : येत्या अठरा ऑक्टोबरपासून राज्य सरकारने सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्यास मुभा दिलीय. राज्य सरकारच्या या निर्णयाचं सिनेमागृह चालकांनी स्वागत केलं असून कोविड नियमांचं पालन करून थिएटर्स 100% क्षमतेनं भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.Cinema driver happy, welcomes state government decision
दरम्यान, वीजबिलातदेखील सवलत देण्यात यावी, मागील 18 महिन्यांपासून सिनेमागृह बंद असल्याने मोठी अडचण होतेय आणि हीच परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने याचा सहानुभूतीने विचार करावा, अशा भावना सिनेमागृह चालकांनी व्यक्त केल्या आहेत.
चित्रपटगृहांना 100 टक्के क्षमतेची परवानगी द्या’
- राज्य सरकारच्या निर्णयाचे सिनेमागृह चालकांकडून स्वागत
- पुढील महिन्यापासून चित्रपटगृहांना सुरू करण्यास मुभा
- कोविड नियमांचं पालन करावं लागणार
- थिएटर्स मालक आनंदी, 18 महिन्यांनी उघडणार सिनेमागृहे
- 100 टक्के परवानगी देण्याची थिएटर्स मालकांची मागणी
- सरकारने सहनुभूतीने विचार करण्याची मागणी
Cinema driver happy, welcomes state government decision