विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकारणाच्या पलीकडे जाऊन महिला नेत्याच्या पाठीमागे उभे राहण्याचा आदर्श भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी घालून दिला आहे. राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन आल्यावर चित्रा वाघ यांनी त्यांना आधार दिला आहे.Chitra Wagh supported Ncps Skshana Salgar despite of being in different partys
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरून सक्षणा सलगर यांनी पडळकर यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावरुनच सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन आल्याचे ट्विट त्यांनी केले. त्यावर सक्षणा सलगर यांच्या पाठीमागे आपण उभ्या आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे की, मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आमदार गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.
सक्षणा सलगर यांनी केलेल्या ट्वीटनंतर चित्रा वाघ यांनी आपण सक्षणा यांच्या पाठीशी असल्याचे ट्विट केले. त्या म्हणाल्या, सक्षणा, तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी. पोलिसात लेखी तक्रार ही कर. मी तुझ्यासोबत आहे. अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू.
विशेष म्हणजे सक्षणा सलगर यांनी हा व्हिडीओ केल्यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोणा नेत्याने त्यांना दिलासा दिला नाही. राष्टÑवादीचे सरकारमधील सहयोगी पक्ष असलेल्य शिवसेना किंवा कॉँग्रेसनेही त्यांना पाठिंबा दिलेला नाही. मात्र, भाजपाच्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे त्यांच्या पाठीमागे उभ्या असल्याचे म्हटले आहे.
पुण्यामध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पूजाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी रान उठविले होते. त्यांनी आवाज उठविल्यानेच वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
यावेळी चित्रा वाघ या राजकीय भूमिकेतून या प्रकरणात उतरल्याची टीका केली जात होती. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यासाठीही त्याच तडफेने उभे राहून चित्रा वाघ यांनी महिलांच्या हक्कांच्या आणि अधिकाराच्या प्रश्नावर आपण संवेदनशील असल्याचे दाखवित विरोधकांना उत्तर दिले आहे.
Chitra Wagh supported Ncps Skshana Salgar despite of being in different partys
महत्त्वाच्या बातम्या
- भगौड्या नीरव मोदीची बहिणीनेही सोडली साथ, १७ कोटी रुपये भारताला परत देत बनली माफीचा साक्षीदार
- अयोध्येत भगवा फडकविण्यासाठी कॉँग्रेस आणि बहुजन समाज पक्षानेही केली भाजपला मदत
- गाझियाबाद आणि गुवाहाटीचा संदेश; लांगूलचालन नाही, तर पुरोगामी – प्रगतिशील मुस्लीमांचे सामीलीकरण
- औरंगाबादच्या इरफान उर्फ दानिशचा लाकडी खेळण्यांच्या नावाखाली हत्यारे खरेदी – विक्रीचा “खेळ” जूनाच…!!; आता विकलेल्या तलवारींचा शोध सुरू