विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात अपहरणाच्या घटना वाढत असल्याबद्दल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ठाकरे- पवार सरकार मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याची टीका त्यांनी केली. Chitra Wagh expresses grave concern over rising kidnappings in the state; Thackeray: Allegation that Pawar government is blindfolded
पालकांना पोलिसांचा कोणताही आधार नाही. गुंड सोकावले असून त्यांच्यावर धाक कोणाचा उरला नसल्याचे त्या म्हणाल्या. नाशिक, पुणे, बार्शी, मंचर येथून अल्पवयीन मुला आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
- २५ हजार महिला, मुली राज्यातून गायब
- नाशिकमध्ये एकाच दिवशी चार मुलींचे अपहरण
- नाशिकमध्ये एकीच्या अपहरणाचा प्रयत्न
- बार्शीत पंधरा वर्षाची साक्षी हिंगोलेचे अपहरण
- पुण्यात १२ वर्षांची जुई कुलकर्णीचे अपहरण
- विमाननगरमध्ये आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल
- जुईचे आई- वडील दृष्टिहीन आहेत
- बाणेरमधून चार वर्षाच्या स्वर्णम जाधवचे अपहरण
- बाणेरमधील दिवसाढवळ्या घटना
- वाहतूक पोलिसांचे सीसीटीव्ही बंद असल्याचे स्पष्ट
- मंचरमधील पंधरा वर्षांचा उमेश सानपचे अपहरण