• Download App
    चिपळूण : आमदार भास्कर जाधवांनी चालवली बस , पाहिल्यानंतर सारेच झाले अवाक्Chiplun: MLA Bhaskar Jadhav drove the bus

    चिपळूण : आमदार भास्कर जाधवांनी चालवली बस , पाहिल्यानंतर सारेच झाले अवाक्

    बसच्या चालकाच्या जागी बसलेल्या व्यक्तीला पाहून अनेकांना धक्काच बसला.कारण आमदार भास्कर जाधव हे बस चालवत हाेते.Chiplun: MLA Bhaskar Jadhav drove the bus


    विशेष प्रतिनिधी

    चिपळूण : आमदार भास्कर जाधव हे कधी शेतात नांगरणी करताना दिसतात तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना , तर कधी ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसतात.पण आज चक्क आमदार भास्कर जाधव बस चालविताना चिपळूणकरांना दिसले.

    चिपळूण महामार्गावरील एका कार्यालयातून एक नवी काेरी बस बाहेर पडली.दरम्यान बसच्या चालकाच्या जागी बसलेल्या व्यक्तीला पाहून अनेकांना धक्काच बसला.कारण आमदार भास्कर जाधव हे बस चालवत हाेते. हे सारे पाहिल्यानंतर सारेच अवाक् झाले.



    भास्कर जाधव यांच्या एका कार्यकर्त्याने व्यवसायासाठी ही बस आणली हाेती.दरम्यान ताे मित्र बस घेऊन थेट भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ आला.भास्कर जाधव यांनी श्रीफळ वाढविले आणि गाडीला हार घातला.

    दरम्यान त्यांनी गाडीचे स्टेअरिंग हाती धरले.तसेच चिपळुणातून फेरफटका मारुन ते पुन्हा कार्यालयाजवळ आले. अत्यंत सफाईदारपणे गाडी चालविताना पाहून अनेकांनी तर ‘शेठ, तुमचे ड्रायव्हिंगही आहे ग्रेट’, अशी उपमाही देऊन टाकली.

    Chiplun: MLA Bhaskar Jadhav drove the bus

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!