कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन अखेर आज पार पडत आहे. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. हे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची या सोहळ्याला ऑनलाइन उपस्थिती राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. Chipi Airport will be inauguration in Konkan today, CM Thackeray Minister Rane Will Share Stage After 12 Years
विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन अखेर आज पार पडत आहे. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. हे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची या सोहळ्याला ऑनलाइन उपस्थिती राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरू झालेला वाद आता निमंत्रण पत्रिकेवर येऊन ठेपला आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यावरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. माणसाने किती संकुचित असावं हे यातून दिसंत, असा टोला राणेंनी लगावलाय. तर राणेंच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
सरकारला प्रोटोकॉल कळतो. त्याप्रमाणेच निमंत्रण पत्रिका दिली आहे. विकास कामांवर बोलत आहात. तुम्ही काय विकास केला ते आधी बघा. ज्यांना सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरही तसंच टाकलं आहे. त्यांनी जिल्ह्याचा नाही तर व्यक्तिगत विकास जास्त केलाय. ते यादी जाहीर करणार म्हणत आहेत, तर त्यांनी स्वत:चं नाव सर्वात वर टाकावं, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
फडणवीस व दरेकरांना साधं निमंत्रणही नाही
चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना या कार्यक्रमाचं अद्यापही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चिपीच्या लोकार्पण सोहळ्यावरून मानापमान नाट्य रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
Chipi Airport will be inauguration in Konkan today, CM Thackeray Minister Rane Will Share Stage After 12 Years
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल