चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी तोडण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.Chikhli: Crime filed against BJP MLA Shweta Mahalen and 30 other activists today
विशेष प्रतिनिधी
चिखली : बुलढाणा जिल्ह्यातील तसेच चिखली तालुक्यातील वीज महावितरण कंपनीने तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत जोडण्यात यावे या मागणीसाठी चिखली येथील मुख्य महामार्ग पुणे नागपूरवर तब्बल चार तास रास्ता रोको भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले हाेते.पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही.
यामुळे भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह त्यांच्या ३० कार्यकर्त्यांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याआधीही आमदार महाले यांच्यावर करोना काळात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी तोडण्यात आली आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासाठी आमदार महाले यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व त्यांनी पुणे-नागपूर महामार्गावर चार तास रास्ता रोको केला होता.