मुंबईतील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाईन-३ चे काम प्रगतीपथावर आहे.Chief Minister Uddhav Thackeray’s order: Test the metro without hitting any tree!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरेतील राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुंबईतील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाईन-३ चे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश इथं ३ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्या ठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे.
आता प्रत्यक्षात याची चाचणी मुंबई येथे १० हजार किमी चालवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवर देखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पध्दतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.
सध्या मरोळ मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू असून या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीच्या कामाकरिता कोणतंही झाड तोडण्यात येणार नाही.
Chief Minister Uddhav Thackeray’s order: Test the metro without hitting any tree!
महत्त्वाच्या बातम्या
- हृदयशस्त्रक्रिया झालेल्या सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला
- “पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही भरपाई शासनाने द्यावी”- पंकजा मुंडे
- राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, सरकारकडून लेखी आश्वासनावर ठाम; आपत्कालीन रुग्णसेवा पुरवणार
- India’s Top Richest List 2021 : मुकेश अंबानी आशियातील गर्भश्रीमंत, अदानी यांच्या संपत्तीमध्ये दररोज १००२ कोटी रुपयांची पडतेय भर