विशेष प्रतिनिधी
शिर्डी : उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाहीत. हे चोर आणि लुटारुंचे सरकार आहे. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून वसुली सुरू आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.Chief Minister Uddhav Thackeray, the government of thieves and robbers, Prakash Ambedkar’s accusation
आंबेडकर म्हणाले , एसटी महामंडळाचा निरोप दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाहीत. हे चोर आणि लुटारुंचे सरकार आहे. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून वसुली सुरू आहे. जेवढे दिवस कामावर गेला नाहीत, त्याची नुकसान भरपाई घेतली जात आहे.
पगार कपात होत असल्यामुळे कामावर जावे की नाही, असा प्रश्न आता कामगारांपुढे आहे. एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यावाच लागेल.आंबेडकर म्हणाले की, एसटी संपाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी पहिला राजकीय पक्ष होता. अडचणीत येण्याइतपत आंदोलन ताणू नये असा सल्लाही आम्ही दिला होता.
मात्र, काही उपटसुंभ कामगार नेत्यांच्या पाठीमागे लागल्याने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. महाविकास आघाडी सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचे आहे. सत्ताधारी आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि सत्तेतील राजकीय पक्षांचे अध्यक्ष याचा हाच प्रयत्न आहे. सत्ताधाऱ्यांना आपल्या खाजगी बसेस चालवायच्या आहेत. त्यासाठी त्यांना संप साधन मिळाले आहे.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपावर आंबेडकर म्हणाले की, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये फेरफार केली जाऊ शकते. फॉरेन्सिक लॅब जोपर्यंत हे सत्य आहे असे सांगत नाही, तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देऊ नये. ते शिष्टाचाराला धरुन नाही.