• Download App
    ‘’बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण...’’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर! Chief Minister Eknath Shinde responded to Uddhav Thackerayes criticism

    ‘’बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण…’’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

    ‘’स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर…’’ असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

     मुंबई : शिवेसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना, जोडे पुसायची लायकी नसलेली राज्यकर्ते,  ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारचं असे उद्गार काढले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.Chief Minister Eknath Shinde responded to Uddhav Thackerayes criticism

    ‘’बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे. या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचा आहे.’’ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

    ‘’वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही, त्यांच्या …’’ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

    याचबरोबर ‘’स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही.’’ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? –

    ‘’जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही शक्य होतं, ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारचं’’ अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली होती.

    Chief Minister Eknath Shinde responded to Uddhav Thackerayes criticism

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस