विशेष प्रतिनिधी
पुणे: मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे गुरूवार, 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.Chhatrapati Sambhaji Raje will meet the President with all-party delegation on Thursday for Maratha reservation.
यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे खासदार व काँग्रेसचे आमदार हेही संभाजी राजे यांच्यासमवेत असणार आहेत.खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते.
संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.
Chhatrapati Sambhaji Raje will meet the President with all-party delegation on Thursday for Maratha reservation.
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या
- तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी
- मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका