• Download App
    Chandrakantdada's Saburi language, yet Narayan Rane is aggressive; If he has not committed any crime, what will he do?

    चंद्रकांतदादांची सबुरीची भाषा, तरीही नारायण राणे आक्रमकच; गुन्हाच केलेला नाही तर ते काय अटक करणार?, आमचे सरकार त्यांच्या “वरती” बघून घेऊ

    विशेष प्रतिनिधी

    चिपळूण : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सबुरीची भाषा वापरली असली, तरी नारायण राणे यांनी आपली आक्रमकता सोडलेली नाही. मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. आदेश कुठलाही काढू द्या, तो काय राष्ट्रपती आहे का की पंतप्रधान आहे ? माझे वक्तव्य तपासून घ्यावे, पोलिसांची तत्परता राज्य सरकारच्या ‘आदेशा’मुळे आहे. पण आमचेही सरकार त्यांच्या “वरती” आहे. आम्ही पाहून घेऊ, असा इशारा नारायण राणे यांनी देऊन टाकला. Chandrakantdada’s Saburi language, yet Narayan Rane is aggressive; If he has not committed any crime, what will he do?

    जन आशीर्वाद यात्रा नियोजनानुसार होईल. आमची दुप्पट आक्रमकता आहे. नारायण राणे निघाले आणि तिथेच शिवसेना संपली. मी स्वतः प्रॅक्टिकल वकील आहे. गुन्हा कुठे घडतो हे मला माहित आहे. सर्वांसाठी कायदा आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.



    नारायण राणे म्हणाले, की मूळात मी कुठलाही गुन्हा केला नाही. ‘१५ ऑगस्ट’ हा स्वातंत्र्य दिन हा मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. मी त्यावर बोलताना म्हणालो होतो की, ‘मी तेथे असतो तर…’ असे म्हटलो आहे. ‘मी आता कानशिलात मारेन…’ असे म्हटले असते तर तो गुन्हा ठरला असता. मी माध्यमांचा आदर करतो म्हणून उत्तर देतो. पण म्हणून तुम्ही पण काहीही बातम्या दाखवू नका, अन्यथा मी तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करीन, असा इशारा नारायण राणे यांनी माध्यमांना दिला.

    कोकणातले भाजप कार्यकर्ते आक्रमक

    नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेकरिता आज चिपळूण आणि रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अटकेची बातमी समोर झाल्यावर यात्राप्रमुख प्रमोद जठार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी दसरा मेळावा असो किंवा राष्ट्रवादीचे गृहमंत्री असोत त्यांनी केलेली भाषा चालते. सरकारने ठाकरी भाषेत उत्तर द्यावे. राणेसाहेब यांनी काही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. त्यांना अटक करण्यासाठी पथक आले तर आम्ही कोकणचे सर्व भाजप कार्यकर्ते अटक करून घेऊ, असे प्रमोद जठार म्हणाले. यात्रा नियोजन ठरल्याप्रमाणे होणार आहे, त्यामुळे सर्व कार्यक्रम होणार आहेत, असेही जठार यांनी स्पष्ट केले.

    Chandrakantdada’s Saburi language, yet Narayan Rane is aggressive; If he has not committed any crime, what will he do?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ