• Download App
    काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानाच्या मुलाला शिक्षणासाठी चंद्रकांतदादा + एमआयटी यांचा मदतीचा हात!!Chandrakantada + MIT help the son of a martyred soldier in Kashmir for education!

    काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानाच्या मुलाला शिक्षणासाठी चंद्रकांतदादा + एमआयटी यांचा मदतीचा हात!!

    प्रतिनिधी

    पुणे : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानाचा मुलगा विश्वजीत मोरे याला शिक्षणासाठी सहाय्य मिळावे यासाठी राज्याचे मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्तीशः प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश मिळाले असून एमआयटी शिक्षण संस्थेने 5 वर्षांसाठी 50 % शुल्क माफ केले आहे. Chandrakantada + MIT help the son of a martyred soldier in Kashmir for education!

    श्रीमती दिपाली मोरे यांचे पती विजय मोरे यांना २००४ साली काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यावेळी श्रीमती दिपाली मोरे या गर्भवती होत्या. मुलाच्या जन्मापूर्वीच पतीला वीरमरण आल्याने श्रीमती दिपाली मोरे यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. त्यातच जन्मतः मुलाचे हृदय कमकुवत असल्याने श्रीमती मोरे यांना विश्वजीतची काळजी घ्यावी लागत होती. वैद्यकीय उपचारांवर प्रचंड खर्च करावा लागत होता.

    सुदैवाने श्रीमती मोरे यांच्या प्रयत्नांना यश आले आणि विश्वजीत हृदयाच्या आजारातून बरा झाल्याचे डॉक्टरांनी सर्व चाचण्यांअंती सांगितले. यानंतर विश्वजीतनेही गरुडझेप घेत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन यश मिळवले‌. तसेच एमआयटी सारख्या नामांकित संस्थेत आर्किटेक्टचे शिक्षण घेण्यासाठी पात्रता परीक्षेतही घवघवीत यश संपादन केले.

    मात्र, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने श्रीमती दिपाली मोरे यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा यासंदर्भात त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. या वीरपुत्राच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी एमआयटीचे डॉ. मंगेश कराड यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची सूचना चंद्रकांत दादांनी त्यांना केली.

    यानंतर डॉ. मंगेश कराड यांनी सर्व माहिती घेऊन आणि सामाजिक बांधिलकी राखून विश्वजीत मोरेच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. त्याला एमआयटीमधून उत्तम दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी 5 वर्षांचे 50 % शुल्क माफ केले.

    एमआयटीने दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत चंद्रकांतदादांनी डॉ. मंगेश कराड यांचा विशेष सत्कार केला. यावेळी एमआयटीचे राहुल कराड, श्रीमती दिपाली मोरे, विश्वजीत मोरे हे उपस्थित होते.

    Chandrakantada + MIT help the son of a martyred soldier in Kashmir for education!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना