• Download App
    "केंद्र सरकारने इंधनदर कपात केल्यानंतर महाराष्ट्र सरकारची अशी दानत नाही" अशी चंद्रकांत पाटील यांची टीका | Chandrakant patil critcizes Maharashtra government after Central government fuel prices decision

    “केंद्र सरकारने इंधनदर कपात केल्यानंतर महाराष्ट्र सरकारची अशी दानत नाही” अशी चंद्रकांत पाटील यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: केंद्र आणि काही राज्य सरकारांकडून देशातील नागरिकांना दिवाळीची एक मोठी भेट मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय बुधवारी केंद्र सरकारने घेतला. डिझेलवरील शुल्कात दहा रुपये तर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क यामध्ये पाच रुपये एवढी कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे काही राज्यांनी सरकारकडून आकारला जाणारा vat कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या राज्यांमधील इंधन दरात स्वस्ताई आली आहे.

    Chandrakant patil critcizes Maharashtra government after Central government fuel prices decision

    या निर्णयानंतर ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे इंधन दर कधी कमी करणार असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारला जात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीलाही हा सवाल करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे टीव्ही९ सोबत बोलताना म्हणाले की, “इंधनाच्या दरात कपात करण्याची महाराष्ट्र सरकारची दानत नाही. महाराष्ट्रात इंधनावरील दर कमी करण्याची परंपरा नाही व त्यामुळे मी याबाबत आशावादी नाही.”


    सर्वसामान्य माणूस समीर वानखेडे यांच्यामागेच उभा, चंद्रकांत पाटील यांचा इशारा


    राज्य सरकारला फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवता येते. महाराष्ट्र सरकार पेट्रोल व डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करून दिलासा देईल असे मला वाटत नाही व याची मला शंभर टक्के खात्री आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका करताना असे म्हटले की, किमान पंचवीस किंवा पन्नास रुपये इंधन कपात करायला हवी होती. शंभर रुपये वाढवून पाच रुपये कमी करायचे हे कसले मोठे मन? असा सवाल त्यांनी केला.

    Chandrakant patil critcizes Maharashtra government after Central government fuel prices decision

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!