• Download App
    परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी ९ आणि १० ऑक्टोबरला; एक ते ३ ऑक्टोबरदरम्यान एसएमएसद्वारे कळवणार परीक्षा केंद्रCET of students who failed to attend the exam due to floods on 9th and 10th October; The examination center will inform via SMS from 1st to 3rd October

    परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी ९ आणि १० ऑक्टोबरला; १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान एसएमएसद्वारे कळवणार परीक्षा केंद्र

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: राज्यात गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ९ आणि १० ऑक्टोबर रोजी परीक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. CET of students who failed to attend the exam due to floods on 9th and 10th October; The examination center will inform via SMS from 1st to 3rd October

    या नैसर्गि‍क आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्रप्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येऊन प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देऊ न शकल्याची विविध कारणे सीईटी कक्षाकडे नोंदवले आहेत. विद्यार्थ्यांना कोरोना, अतिवृष्टी, डेंगू, मलेरिया, टायफाॅइड इ. साथीचे आजार, रोड दुर्घटनेमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचण, एकाच दिवशी दोन परीक्षा आणि इतर कारणे यामध्ये द्यायची आहेत.

    पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या उमेदवारांना १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पात्र उमेदवारांना ई-मेल व एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क यापूर्वी भरले असल्यामुळे त्यांची नि:शुल्क नोंदणी करून घेण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्रे उपलब्ध करून देऊन ९ व १० ऑक्टोबर रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.

    CET of students who failed to attend the exam due to floods on 9th and 10th October; The examination center will inform via SMS from 1st to 3rd October

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!