विशेष प्रतिनिधी
पुणे: येत्या तीन ते चार दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांंशी उदय सामंत यांनी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.CET dates will be announced soon, Higher and Technical Education Minister Uday Samant said
सीईटी परीक्षांसाठी राज्यातील पूर्वीची १९३ परीक्षा केंद्र ३५० पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही कालावधी जात आहे. त्यामुळे या पूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंदाजित तारखांमध्ये बदल करावा लागला, असे ते म्हणाले.
बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला असून, अनेक विद्यार्थ्यांंनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला आहे. मात्र, अद्याप सीईटीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
करोना परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, करोनाची तिसरी लाट येताना दिसत असेल तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे ‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
CET dates will be announced soon, Higher and Technical Education Minister Uday Samant said
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिरे उघडणे, दहीहंडी उत्सव या मुद्द्यांवरून “हिंदू” शब्द विसरलेल्या उद्धव ठाकरेंना भाजप – मनसेने घेरले
- Jai Kanhaiya Lal ki : देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष ; PM मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा
- मेंदूचा शाेध व बोध : सतत जागा राहणारा तल्लख मेंदू, झोपेतदेखील मेंदूचं काम थांबत नाही
- मंदिर उघडले नाही तर राज्यभर तांडव, मुख्यमंत्र्यांनी धर्मयुद्धासाठी तयार रहावे भाजप अध्यात्मिक आघाडीचा इशारा