इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या पुणे शाखेतर्फे ‘जिओटेक्निकल इंजिनिअरिंग- काल, आज आणि उद्या’ या विषयावरील चर्चासत्रात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या क्षेत्रातील सरकारची भूमिका स्पष्ट केली.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पुढील २५ वर्षांनी देश कसा असेल, हे डोळयासमोर ठेऊन सरकारचे नियोजन चालू आहे.विकास आणि तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. त्यासाठी प्रधानमंत्री गती शक्ती योजनाला गती देण्यात आली आहे. मोठया प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. त्यात अभियंत्यांना मोठे योगदान देण्याची संधी आहे अशी अपेक्षा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज व्यक्त केली. इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या पुणे शाखेतर्फे ‘जिओटेक्निकल इंजिनिअरिंग- काल, आज आणि उद्या’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. Central Deputy Finanace Minister Bhagvat karad speech on Giotechnical Engineering
यावेळी डॉ. भागवत कराड , कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भाजपचे शहर संघटन सचिव राजेश पांडे, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते , संयोजन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. कराड म्हणाले, समाज घडविण्याचे काम उच्चशिक्षित मंडळींचे आहे. अभियंते, डॉक्टर होणे आजही महत्वाचे मानले जाते. उच्च शिक्षितांनी आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना द्यावा.
डॉ. करमळकर म्हणाले, पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी जिओटेक्नीकल एंजिनिअरिंगचे महत्व कायम राहणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात आय. ओ.टी. पासून अनेक नवे तंत्रज्ञान येत आहे. तरीही प्रत्यक्ष जमिनीवरील कामाचे महत्व कधीही कमी होणार नाही. त्या दृष्टीने ज्ञान अद्ययावत करण्यासाठी जिओटेक्नीकल इंजीनियरिंग सोसायटीचे प्रयत्न स्तुत्य आहेत. त्याचा तरुण पिढीने लाभ घेतला पाहिजे. जिओ टेक्नीकल क्षेत्रातील जगभरातील बदलांची नोंद घेणारे व्यासपीठ सतत कार्यरत राहिले पाहिजे. तरुण पिढीने हे क्षेत्र पुढे नेले पाहिजे.
‘रॉक मेकॅनिक्स इन स्पेस एक्स्प्लोरेशन,केस स्टडीज ऑफ ब्रिज फाउंडेशन्स इन महाराष्ट्र,कन्स्ट्रक्शन ऑफ डायफ्रॅम वॉल,अंडरग्राउंड मेट्रो -येस्टर्डे,टुडे,टुमारो,एमआयएफ बेस्ड लेयर कोएफीशंट्स फॉर डिझाईन ऑफ गिओग्रिड अँड जिओसेल -रिइन्फोर्समेंट फ्लेक्झिबल पेव्हमेंट्स,स्लोप फेल्युअर अँड रोकफॉल मिटिगेशन वर्क्स ऑन कोकण रेल्वे’ अशा विषयांवर तांत्रिक मांडणी यावेळी करण्यात आली .
Central Deputy Finanace Minister Bhagvat karad speech on Giotechnical Engineering
महत्त्वाच्या बातम्या
- फिरोजपूर सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त; पाकिस्तानचा आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा पकडला
- Modi – Yogi – Fadanavis : मोदी – योगींपाठोपाठ फडणवीसांची देशभर चर्चा; कळतोय का “जाणत्यांना” अर्थ…??
- शास्त्रीय संगीतासाठी नवीन पिढीचे’ कान ‘ तयार करावे – शरद पवार
- राष्ट्रपती पदकासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह चारजणांवर गुन्हा दाखल