- केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. यामध्ये सचिन वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटसचा तपशील आहे. ही डायरी तपासासाठी आपल्याला मिळावी, अशी मागणी सीबीआयने NIA कोर्टात केली होती.
- डायरीतून अनेक आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
विशेषप्रतिनिधी
मुंबई : सचिन वाझे यांच्या केबिनमधून सापडलेली डायरी सीबीआयने ताब्यात घेतली आहे. या डायरीमध्ये त्यांच्या सर्व वसुलीचे रेटकार्ड सापडले आहेत. किती जणांकडून उधारी घेणे बाकी आहे? याची नोंद डायरीत आहे. CBI to probe Sachin Vaze Diary in 100 crore allegations on Anil Deshmukh
एनआयएला सचिन वझे यांच्या निकटवर्तीय मीना जॉर्ज यांच्या घरातूनही डायरी सापडली होती. सीबीआयने ती डायरीही ताब्यात घेतली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश दिल्याच्या आरोपांचा सीबीआय प्राथमिक तपास करत आहे.
दरम्यान, काल सीबीआय अधिकारी सचिन वाझेंच्या दोन वाहन चालकांना डीआरडीओमध्ये स्वतः घेऊन आले होते. तर पीए कुंदन आणि पलांडे यांना समन्स पाठवून बोलावले गेले होते. या सर्वांची 8 ते 10 तास चौकशी केली गेली. यापूर्वी सचिन वाझे, बार मालक महेश शेट्टी, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, फिर्यादी जयश्री पाटील यांचे जबाब आधीच नोंदवले गेले आहेत.
काय आहे डायरीत ?
कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याची तारीख डायरीत नमूद . पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख .
हफ्त्याची गुपितं
डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.
कोड भाषेत नोंद
लाखाच्या नोंदीसाठी L, तर हजाराच्या नोंदीसाठी K हे अक्षर वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशाचं वाटप नियमित होत होतं. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. व्यक्तीऐवजी विभाग लिहिण्यात आला आहे.