• Download App
    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागांवर सीबीआयच्या धाडी, अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल । CBI raids the premises of former Home Minister Anil Deshmukh, cases registered against many

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागांवर सीबीआयच्या धाडी, अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल

    Anil Deshmukh : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील जागांवर छापे टाकले जात आहेत. तथापि, एजन्सीने कोणत्या प्रकरणात छापा टाकला जात आहे यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. CBI raids the premises of former Home Minister Anil Deshmukh, cases registered against many


    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील जागांवर छापे टाकले जात आहेत. तथापि, एजन्सीने कोणत्या प्रकरणात छापा टाकला जात आहे यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही.

    देशमुख यांच्यासह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल

    असे सांगितले जात आहे की, सीबीआयने देशमुख आणि इतर काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हेगारी षडयंत्रासाठी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली “सार्वजनिक कर्तव्यांच्या अयोग्य आणि अप्रामाणिक निर्वहनाने अनुचित लाभ मिळवण्याचा प्रयत्न” करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्राप्तिकर विभागाने शोधले होते 17 कोटींचे छुपे उत्पन्न

    गेल्या महिन्यात अनिल देशमुख आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित संस्थांवर छापे टाकल्यानंतर प्राप्तिकर विभागाने 17 कोटी रुपयांचे “छुपे उत्पन्न” शोधले होते. तीन शिक्षण संस्था चालवणाऱ्या देशमुख यांच्याशी जोडलेल्या नागपूरस्थित ट्रस्टमध्येही प्राप्तिकर विभागाने आर्थिक अनियमितता शोधली होती.

    त्याचवेळी, मुंबईतील वसुली प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. नोटीस बजावल्यानंतर अनिल देशमुख देश सोडू शकत नाहीत. देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना 100 कोटींहून अधिक वसुली केल्याचा आरोप आहे.

    ईडीच्या पाच वेळा नोटिसा

    अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात उपस्थित राहण्यासाठी पाच नोटिसा बजावल्या होत्या, पण ते हजर झाले नाहीत. एजन्सीने सांगितले की, प्रत्येक वेळी अनिल देशमुख आणि त्याच्या वकिलांच्या वतीने ईडीला वेगवेगळे कारण दिले जात आहे.

    CBI raids the premises of former Home Minister Anil Deshmukh, cases registered against many

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू