• Download App
    नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून 32 साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर, पुढील सुनावणीपासून साक्ष नोंदविली जाणार|CBI presents list of 32 witnesses in Narendra Dabholkar murder case

    नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून 32 साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर, पुढील सुनावणीपासून साक्ष नोंदविली जाणार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी बुधवारी सीबीआयच्या वकिलांनी 32 साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर केली. पुढील सुनावणी येत्या 29 ऑक्टोबर रोजी होणार असून साक्ष नोंदणी तसेच उलटतपासणीला सुरूवात होणार आहे.CBI presents list of 32 witnesses in Narendra Dabholkar murder case

    विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी तब्बल आठ वर्षानंतर आरोपी डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित्त करण्यात आले.



    त्यानंतर सीबीआयच्या वतीने पुराव्यांची कागदपत्रांची यादी सादर करण्यात आली होती. बुधवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सीबीआयचे वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी 32 साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली.

    पुढील सुनावणी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर मध्ये प्रत्येक शनिवारी 13, 20 आणि 27 रोजी सुनावणी होणार तसेच डिसेंबर महिन्यातील 4, 11, 18 आणि 19 तारखेला सुनावणी होणार आहे. या दरम्यान साक्ष नोंदणी आणि आरोपीच्या वकीलाकडून उलटतपासणी होणार आहे. तसेच सुनावणीच्या दिवशी केवळ डॉ. दाभोलकर खटल्यावरच कामकाज चालणार असेही न्यायाधीशांनी सांगितले.

    इन्क्वेस्ट पंचनामा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर पुण्यात आल्यानंतर घटनेच्या पूर्वी जेथे राहिले होते त्या सदनिकेची झडती घेतली तेव्हा उपस्थित असलेला साक्षीदार यांची साक्ष 29 ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर नोंदविली जाणार आहे.

    तत्पूर्वी आरोपीचे वकील सुवर्णा आव्हाड- वस्त यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे शवविच्छेदन सीडी, एक्सरे, आणि घटनास्थळावरील छायाचित्रे आणि मृतदेहाचे छायाचित्रे आदींची मागणी अर्जाव्दारे केली. त्यावर न्यायालयाने सदर साहित्य ईमेल अथवा प्रत्यक्षात येत्या आठ दिवसांत आव्हाड यांना देण्यात यावे अशी सूचना सीबीआयच्या अधिकार्‍यांना केली.

    औरंगाबाद येथील कारागृहात असलेला आरोपी सचिन अंदुरे आणि आर्थर रोड कारागृहात असलेला शरद कळसकर या दोघांना येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. बुधवारी आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदूरे आणि शरद कळसकर या तीघांनी येरवडा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात हजेरी लावली.

    तर आरोपी विक्रम भावे प्रत्यक्ष न्यायालयात हजर होता. मात्र, यापुढील सुनावणीला आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.आरोपींशी संवाद साधायचा आहे थोडा अवधी द्यावा अशी मागणी वकील सुवर्णा आव्हाड यांनी केली. मात्र, ती न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी फेटाळून लावली.

    आपणास दीड महिन्याचा कालावधी दिलेला आहे असे सांगत आता आणखी तारीख वाढवून मागू नका. आपण आरोपीना न्यायालयात आल्यास भेटा त्यांच्याशी बोला अथवा कारागृहात जाऊन कधीही बोलू शकता असे सांगितले. तसेच आपल्याला साक्षीदारांची यादी दिली आहे त्यावर पुढील तारखेपासून सुनावणी होणार असल्याचेही सांगितले.

    CBI presents list of 32 witnesses in Narendra Dabholkar murder case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!