• Download App
    आयफोन १२ प्रो स्मार्टफोनसाठी सीबीआय अधिकाºयाने फोडला अनिल देशमुख यांच्याशी संबंधित अहवाल! CBI official leaks report related to Anil Deshmukh for iPhone 12 Pro smartphone!

    आयफोन १२ प्रो स्मार्टफोनसाठी सीबीआय अधिकाऱ्याने फोडला अनिल देशमुख यांच्याशी संबंधित अहवाल!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित गोपनीय अहवाल फोडण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्याला लाच म्हणून महागडा आयफोन १२ प्रो हा स्मार्टफोन देण्यात आला होता, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे. CBI official leaks report related to Anil Deshmukh for iPhone 12 Pro smartphone!

    अनिल देशमुख यांच्याशी संबंधित चौकशीचा अहवाल फोडल्याप्रकरणी त्यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणातील तपासासाठी तिवारी दोन वेळा पुण्याला गेला होता. तेथे आनंद डागा आणि तिवारी यांची भेट झाली. त्यावेळी त्याला हा फोन देण्यात आला. या फोनची किंमत १ लाख रुपयांहून अधिक आहे. हा फोन जप्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याच फोनचा वापर करुन तिवारीने तपासासंबंधी अतिशय संवेदनशील कागदपत्रे व माहिती आनंद डागा यांना पुरविली.



    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत भ्रष्टाचार प्रकरणाचा गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयच्या एका उपनिरिक्षकालाअटक केरण्यात आली आहे. अनिल देशमुख देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून सुरु असलेल्या तपासाचा अहवालाचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे. तर अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही अटक करण्यात आली आहे.

    अभिषेक तिवारी हे अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी पुणे शहरात आले होत. त्यावेळी तपासाच्या संबंधीत तपशील देण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी अभिषेक तिवारींना आयफोन-१२ प्रो दिला होता, असे सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये दाखल केले आहे. तिवारी यांच्याकडून तो आयफोन जप्त करण्यात आला असुन, तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तिवारी यांनी अनिल देशमुखांच्या वकीलाकडून अनेकवेळा लाच घेतली होती असा सीबीआयचा आरोप आहे. तसेच सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणातील तपास अधिकारी म्हणून प्रकरणाचे तपशील अभिषेक तिवारी यांच्याकडे देण्यात आले होते, मात्र त्यांनी हे तपशीलांचा गैरवापर करण्याचा गुन्हा केला आहे.

    CBI official leaks report related to Anil Deshmukh for iPhone 12 Pro smartphone!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस