वृत्तसंस्था
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याविरुद्धच्या ड्रग्स केसची चौकशी करणारे नार्कोटिक्स कंट्रोल युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे त्याच वेळी सीबीआयने दिल्ली, मुंबई, रांची सह देशभर 29 ठिकाणी देशभर एकाच वेळी छापे घातले आहेत. CBI registers a case against former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede
सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापे घातल्याची बातमी आली असून सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्यन खान याला सुखरूप सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची लाच शाहरुख खान कडे मागितली असल्याची बातमी काही मराठी माध्यमांनी दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर छापे घातले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक केली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती.
त्यातच आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची लाच मागितली होती. त्यातील 8 कोटी वानखेडे यांना देणार होतो, असे साईल यांनी सांगितलं होतं. त्याची गंभीर दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी केली होती. त्याचप्रकरणात सीबीआयने हे छापे कल्याचे सांगण्यात येत आहे.
CBI registers a case against former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede
महत्वाच्या बातम्या
- अदानी-हिंडेनबर्ग वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तज्ज्ञांच्या समितीने न्यायालयात अहवाल सादर केला
- द फोकस एक्सप्लेनर : दिल्ली सरकारच्या कामकाजात नायब राज्यपालांना आता कोणते अधिकार? सर्वोच्च निकालानंतर किती बदल होईल? वाचा सविस्तर
- एलन मस्क सोडणार ट्विटरचे सीईओ पद, 6 आठवड्यांत महिला सीईओ करणार जॉइन
- पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, 4400 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी