विशेष प्रतिनिधी
मुंबई: मी आंबेडकरवादी आहे. जयभीमवाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही इथपर्यंत आला आहे, असे सांगत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी पत्रकार परिषदेतच त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र दाखविले.Caste certificate shown at press conference by the father of Sameer Wankhede, said I am Ambedkarite, Jaybhim Wala
ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची अभिनेत्री सून क्रांती रेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, मी आंबेडकरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा आहे. मला त्याचा मला अभिमान आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही आला आहे. आम्ही दलितांचे हक्क हिरावले नाही. मी आंबेडकरवादी आहे. तुम्ही आमच्यावर निराधार आरोप करू नका.
मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला ज्ञानदेव वानखेडे म्हणाले, लागल्यापासूनचे सर्व कागदपत्रं आमच्याकडे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे. मी मुस्लिम महिलेशी 1978मध्ये लग्न केलं आहे. मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे.
समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही, असा दावा करतानाच आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला बदनाम करू नये. तुम्ही कोर्टात जावं आमची बदनामी करू नका.
आठवले आमच्यासोबत आहे. ते दलितांच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. आम्ही आठवलेंना सर्व माहिती दिली आहे. त्यांना पूर्ण पुरावे दिले आहेत. त्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.
कास्ट सर्टिफिकेटपासून मॅरेज सर्टिफिकेटपासून त्यांचे सर्व दावे फोल ठरले आहेत, असं सांगतानाच नवाब मलिक मोठे नेते आहेत. आमच्याही पाठी मोठा नेता आहे. आम्ही त्यांच्या मदतीने तुम्हाला पुरावा देणार आहोत. त्यामुळे समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक आहेत हे दिसून येईल, असेही ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.
Caste certificate shown at press conference by the father of Sameer Wankhede, said I am Ambedkarite, Jaybhim Wala
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द