विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोंबर रोजी उत्तर प्रदेश मधील लखिमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेश मधील आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या मुलावर झाला आहे. त्यात काही शेतकरी मरण पावले आहेत.
Candle march tribute in Kolhapur to pay tribute to farmers who lost lives in Lakhimpur Kheri incident
शनिवारी दुपारी महाविकास आघाडीची सर्कीट हाऊसमध्ये बैठक झाली. रविवारी रात्री कॅंडल मार्च करणे व सोमवारी कोल्हापूर बंदचे आवाहन करण्याचे ठरले. लखिमपुर घटनेत जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी छ.शिवाजी चौक ते बिंदू चौक दरम्यान रविवारी रात्री कॅंडल मार्च करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी शांततापूर्ण बंद पाळण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील पाटील म्हणाले की, “आम्ही प्रत्येकाला बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत.”
राज्य ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन आयोगाचे प्रमुख राजेश क्षिरसागर, विधानसभा सभासद चंद्रकांत जाधव, राजीव आवळे, जयंत आसगावकरांसह अन्य सभासद या बैठकीत उपस्थित होते.
Candle march tribute in Kolhapur to pay tribute to farmers who lost lives in Lakhimpur Kheri incident
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल