देशात आज सकाळी सात वाजेपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये तीन लोकसभा आणि विधानसभांच्या 30 मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे मतदान सुरू आहे. लोकसभेच्या तीन जागांमध्ये दादरा नगर हावेली, मध्य प्रदेश (खंडवा) आणि हिमाचल प्रदेश (मंडी) येथे मतदान सुरू असून विधानसभेच्या 30 जागा 14 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. By-Polls Voting in four states for three Lok Sabha and 30 Assembly seats, Deglur battle
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात आज सकाळी सात वाजेपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये तीन लोकसभा आणि विधानसभांच्या 30 मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे मतदान सुरू आहे. लोकसभेच्या तीन जागांमध्ये दादरा नगर हावेली, मध्य प्रदेश (खंडवा) आणि हिमाचल प्रदेश (मंडी) येथे मतदान सुरू असून विधानसभेच्या 30 जागा 14 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. त्यात बंगालमध्ये 4 जागा, आसाममध्ये 5 जागा, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, बिहार आणि मिझोराम येथे मतदान सुरू आहे.
दादरा नगर हवेलीच्या लढतीकडे लक्ष
फेब्रुवारी 2021 मध्ये अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे केंद्रशासित प्रदेशातील दादरा नगर हवेलीच्या एकमेव जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे घटक आहेत. या जागेसाठी तिन्ही पक्षांकडून प्रचारासाठी दिग्गज नेतेमंडळी उतरली होती.
देगलूरमध्ये चुरशीचा संघर्ष
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातही मतदान सुरू आहे. देगलूरमध्ये भाजप आणि काँग्रेस, वंचितसह 12 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी झालेला प्रचार पाहता ही निवडणूक अटीतटीची मानली जात आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहार, मधील पोटनिवडणुकांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राजस्थान आणि बिहारमध्ये प्रत्येकी 2 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे, तर हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये 3-3 विधानसभेच्या आणि 1-1 लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्य प्रदेशातील खांडवा येथे लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. रात्री 11 वाजेपर्यंत मध्य प्रदेशात 30 टक्के, राजस्थानमध्ये 25 आणि बिहारमध्ये 21 टक्के मतदान झाले आहे.
2 नोव्हेंबरला निकाल
सर्व जागांचे निकाल 2 नोव्हेंबरला लागणार आहेत. तथापि, प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) च्या उमेदवाराला 13 ऑक्टोबर रोजी बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.
मृत्यू आणि पक्षांतरामुळे रिक्त झाल्या जागा
सदस्यांच्या निधनामुळे लोकसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. दुसरीकडे, काही विधानसभा जागांवर आमदारांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्या, तर अनेक जागांवर पक्षबदल आणि विजयी उमेदवाराच्या राजीनाम्यामुळे जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणुका होत आहेत.
By-Polls Voting in four states for three Lok Sabha and 30 Assembly seats, Deglur battle
महत्त्वाच्या बातम्या
- रजनीकांत यांची शस्त्रक्रिया यशस्वी , थोड्याच दिवसात मिळेल डिस्चार्ज
- Azadi ka Amrit Mahotsav : 75 𝑪𝑹𝑬𝑨𝑻𝑰𝑽𝑬 𝑴𝑰𝑵𝑫𝑺 𝑶𝑭 𝑻𝑶𝑴𝑶𝑹𝑹𝑶𝑾 … सृजनशील कलावंतांना मोदी सरकारची अनोखी संधी;देशभरातून मागवले अर्ज
- आर्यनसाठी जुही चावला झाली जामीनदार, वाचा शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री ?
- पाकिस्तानचा सलग तिसऱ्यांदा विजय; अफगाणिस्तानचा पाच गडी राखून केला पराभव