विशेष प्रतिनिधी
वर्धा : वर्धा शहराच्या अनेक भागात सामुहिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी कार्तिक एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात होते. ग्रामीण भागात या तुळशी विवाहाला विशेष महत्त्व असते.By collective prayer Tulsi marriage started
कार्तिक महिन्यात तुळशी विवाहानंतरच गावोगावच्या विवाह समारंभाना सुरुवात होते. भारतीय संस्कृती तसेच सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी वर्धा शहरातील देशमुख ले आऊट भागात मागील १० वर्षा पासून सामूहिक तुळशी विवाहाची ही परंपरा सातत्याने सुरु आहे.
तुळशी समोर मंगलाष्टकांना सुरवात होते. मंगलाष्टकं पूर्ण होताच आरती करून हे विवाह समारंभ पार पडले, अशी घोषणा पंडितांकडून केली जाते. विशेष बाब म्हणजे वधु पक्षा कडून लग्नाच्या आयोजनाची तसेच जेवणाची तयारी केली जाते.
- सामूहिक प्रार्थना करून तुळशी विवाहास प्रारंभ
- मंगलाष्टकांचे सुमधुर सूर उमटले
- कार्तिक एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात
- देशमुख ले आऊट भागात १० वर्षा पासून सामूहिक तुळशी विवाहाची ही परंपरा
- विवाहानंतर समूह भोजनाची परंपरा कायम