वृत्तसंस्था
मुंबई : येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे, अशी मागणी राज्यातील व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. Business men Urges CM to start trade from 1 June
राज्यातील लॉकडाऊनमुळे दुकाने, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मोठं नुकसान होत आहे. तरी कृपया लॉकडाऊन हटवा,अशी मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली.
महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांत सर्व व्यापार सुरू आहेत. पण, व्यापार बंद राहिल्यास व्यापारी शेजारील राज्यात जाण्याची भीती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही.
त्यामुळे आता 1 जून नंतर कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच अशी व्यापार्यांची आग्रही भूमिका असल्याने सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही ललित गांधी केली. या बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही पाठवण्यात आल्या असुन सरकाने त्वरित निर्णय जाहीर करण्याची मागणीही केली आहे.
निवेदनातील मागण्या
- दोन महिन्यांच्या बंद कालावधीतील महापालिका, नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे माफ करा
- वेगवेगळ्या परवाना फीमध्ये एक वर्षाची माफी द्यावी
- प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिल व कर्जावरील व्याजमाफी यांचा समावेश असलेले विशेष पॅकेज व्यापार्यांसाठी जाहीर करावे
- व्यापारी, कर्मचार्यांसाठी लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करा
Business men Urges CM to start trade from 1 June
महत्त्वाच्या बातम्या
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद
- 7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय
- Coronavirus Cases in India : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ, २४ तासांत २.०८ लाख रुग्णांची नोंद, ४१५७ मृत्यू
- Whatsapp ने भारत सरकारविरुद्ध दाखल केला खटला, नव्या IT नियमांमुळे प्रायव्हसी संपण्याचा दावा