• Download App
    Burning Hindutva ...! What is the matter, 'Mr. Aditya Thackeray'; Saffron turned green! ... Aditya Thackeray's hoarding goes viral on social media ...

    ज्वलंत हिंदुत्व…! क्या बात है ‘जनाब आदित्य ठाकरे ‘ ; भगवा झाला हिरवा! …आदित्य ठाकरे यांचं होर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल…

    आदित्य ठाकरे यांचं एक होर्डिग सोशल मीडियावर झालं व्हायरल…


    भाजप, आपने हिंदुत्वावरून काढला चिमटा


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं एक हिरव्या रंगातील आणि ऊर्दू भाषेत मजकूर असलेलं होर्डिंग राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे. ज्वलंत हिंदुत्ववादी म्हणून शिवसेना बडेजाव मिरवत असताना अजान स्पर्धा घेतली- ऊर्दू कॅलेंडर काढलं -आता या होर्डिंगवरून सोशल मिडियावर जोरदार चर्चा आणि संताप पहायला मिळत आहे. Burning Hindutva …! What is the matter, ‘Mr. Aditya Thackeray’; Saffron turned green! … Aditya Thackeray’s hoarding goes viral on social media …

    भाजप व आपने देखील शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत शिवसेना सत्तेत सहभागी झाली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. मात्र, या नव्या राजकीय समीकरणानंतर भाजपकडून सातत्याने शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्याची आठवण करून देण्यात आली.

    आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनीही आदित्य ठाकरेंचं हे होर्डिंग ट्वीट केलं आहे. त्याचबरोबर ‘भगवा झाला हिरवा… छानच’ असंही म्हटलं आहे. एकप्रकारे आपनेही शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चिमटा काढला आहे.

    हिंदुत्वावरून दोन्ही पक्षात सातत्यानं कलगीतुरा रंगताना दिसला. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या एका होर्डिंगमुळे शिवसेना भाजपतील हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षानेही या होर्डिंगवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    आदित्य ठाकरे यांचं होर्डिग ट्विटरवर शेअर करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. या फोटोला ‘ज्वलंत हिंदुत्व’ अशा ओळी देत आमदार भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला.

    Burning Hindutva …! What is the matter, ‘Mr. Aditya Thackeray’; Saffron turned green! … Aditya Thackeray’s hoarding goes viral on social media …

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा