• Download App
    #BreakTheChain : कोरोना काळामध्ये राज्यात ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी गडहिंग्लज पॅटर्न राबविणार ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती।#BreakTheChain: Corona to implement Gadhinglaj pattern for oxygen generation in the state in time; Information of Minister of State for Home Affairs Satej Patil

    BreakTheChain : कोरोना काळामध्ये राज्यात ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी गडहिंग्लज पॅटर्न राबविणार ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती

    वृत्तसंस्था

    कोल्हापुर : कोल्हापुरातील गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयामधील ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यामध्ये मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आता कोल्हापुरातील गडहिंग्लज पॅटर्न राबविण्याचा राज्य सरकारचा विचार करत आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकामंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांनी दिली. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुकवर शेअर केली. #BreakTheChain: Corona to implement Gadhinglaj pattern for oxygen generation in the state in time; Information of Minister of State for Home Affairs Satej Patil

    गेल्या वर्षी कोल्हापुरातील गडहिंग्लज विभागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यन्वित केले. सोबतच, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी ८० लाख रुपये खर्चून चेन्नईतील ऑक्सएअर कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प उभारला.



    या प्रकल्पाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्यातील नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्साईड बाजूला करून जम्बो सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवला जातो.

    या प्रकल्पातून अत्यंत कमी खर्चामध्ये दिवसाला १२० ते १५० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती केली जात असून १५० ऑक्सिजन बेड्सची ऑक्सिजन पूर्तता यातून केली जाते. या प्रकल्पामुळे वीजबिलाशिवाय इतर कुठलाही खर्च ऑक्सिजन निर्मितीसाठी येत नाही, असे पाटील यांनी सांगितले.

    #Break The Chain: Corona to implement Gadhinglaj pattern for oxygen generation in the state in time; Information of Minister of State for Home Affairs Satej Patil

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस